सोलापूरच्या ग्रामीण भागात आज कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू 

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे आज 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आज बाधितांची संख्या 384 एवढी झाली आहे. दोन हजार 595 अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 210 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 384 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 12 हजार 509 एवढी झाली असून 360 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

बार्शी तालुक्‍यातील धामणगाव येथील 70 वर्षाची महिला, पंढरपुरातील हनुमान मैदानाजवळील 69 वर्षाचे पुरुष, गावडे वस्ती मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, आदर्श नगर बार्शी येथील 76 वर्षाची महिला, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 70 वर्षाची महिला, शनिवार पेठ मंगळवेढा येथील 72 वर्षाची महिला, कुर्डूवाडी येथील 60 वर्षाची महिला, अकलूज येथील 56 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील 38 वर्षाचे पुरुष तर चारी (ता. माळशिरस) येथील 56 वर्षांच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या गावात आढळले नवीन कोरोना बाधित रुग्ण 
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्कलकोट तालुक्‍यातील मराठवाडी, खासबाग गल्ली, बार्शीतील आगळगाव रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, शिवशक्ती मैदानाच्या मागे, भवानी पेठ, बोरगाव खुर्द, ब्राह्मण गल्ली, कॅन्सर हॉस्पिटल, देगाव, देशमुख प्लॉट, ढगे मळा, धामणगाव, धस पिंपळगाव, ढेंबरेवाडी, एकविरा आई चौक, गाडेगाव रोड, गवळी गल्ली, गोंडील प्लॉट, गौडगाव, हांडे गल्ली, इर्लेवाडी, कंदलगाव रोड, कासारवाडी रोड, कतले प्लॉट, खांडवी, कुर्डूवाडी रोड, कुसळंब, लाडोळे, लक्ष्मीनगर, मालवंडी, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, एमएसईबी कॉलनी, नाईकवाडी प्लॉट, पांडे चौक, पानगाव, पंकज नगर, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सुभाशनगर, तुळशीराम रोड, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, वायकुळे प्लॉट, वडशिंगे, वाणी प्लॉट, करमाळ्यातील 72 बंगले, दगडी रोड, जाधव प्लॉट, जेऊर, खडकपुरा, कोर्टी, देवी शाळेजवळ, पोस्ट ऑफिस जवळ, पोथरे, रंभापुरा, रावगाव, सावंत गल्ली, उमरड, वेताळ पेठ, माढा तालुक्‍यातील अंजनगाव उ., अरण, बावी, भोसरे, कव्हे, कुर्डूवाडी, लऊळ, म्हैसगाव, मोडनिंब, पापनास. रिधोरे. रोपळे कव्हे. संमती नगर माढा, सब जेल माढा, तांदुळवाडी, टेंभुर्णी, वडाचीवाडी, वेणेगाव, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बिजवडी, बोंडले, चाहुर, ढगे वस्ती, खंडाळी, खुडूस, माळीनगर, मेडद, नातेपुते, पोस्ट ऑफिस जवळ माळशिरस, निमगाव, पिंपरी, पिसेवाडी, सदाशिव नगर, सांगोला रोड, तामशिदवाडी, तोंडले, उंबरे, दहिगाव, वाघोली, यशवंनगर, मंगळवेढ्यातील बोराळे, चोखामेळा नगर, दामाजी नगर, दत्ता गल्ली, दुर्गामाता नगर, घुमरे गल्ली, किल्ला बाग, सराफ गल्ली, शनिवार पेठ, सिद्धापूर, उचेठाण, व्हनमाने गल्ली, मोहोळ तालुक्‍यातील कुरुल, पंढरपुरातील आंबेडकर नगर, नागालॅंड हॉटेल मागे, भक्तिमार्ग, भाळवणी, भंडीशेगाव, भोसे, बोहाळी, चळे, डाळे गल्ली, धोंडेवाडी, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गोपाळपूर, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, जुनी पेठ, कडबे गल्ली, करकंब, कर्मवीर नगर, कासेगाव, कोर्टी, क्रांती चौक, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, मुक्ताई पेठ, पद्मावती झोपडपट्टी, पळशी, परदेशी नगर, रोहिदास चौक, रुक्‍मिणीनगर, संत पेठ, शेंडगेवाडी, सिद्धेवाडी, सोलापूर रोड, वीर सागर, विस्थापतीनगर, सांगोल्यातील अलराई नगर, आनंदनगर, चिंचोली, कडलास, लोणविरे, महूद, मांजरी, परीठ गल्ली, वाद्राबाद पेठ, यशनगर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होनमुर्गी, भंडारकवठे, मंद्रूप, एनटीपीसी, विडी घरकुल याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com