अर्धांग वायुच्या झटक्यानंतर सासुरवाडीला आलेल्या जावयामुळे कोरोनाबाधित तालुक्यामध्ये माढ्याचा सामावेश

Corana patient in Madha taluka of Solapur district
Corana patient in Madha taluka of Solapur district

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्यात अद्याप कोरोनाबाधित रूग्ण नाही, परंतु पुणे जिल्ह्यातील चाकण येथे अर्धांग वायुचा झटका आल्यानंतर खासगी रूग्णालयात उपचार घेऊन माढा तालुक्यातील वरवडे या सासुरवाडीला आलेल्या जावयाचा ( व्यक्तीचा) रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जावू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, त्याची पत्नी व मुलाचा अशा तिघांनापुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविले असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील व्यक्ती आपल्या कुटुंबासह कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील चाकण येथे रहात होती. या व्यक्तीस 17 मे रोजी अर्धांग वायुच्या झटका आला. त्यामुळे चाकण येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. खेड चाकण परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 23 मे रोजी या रूग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. दरम्यान 24 मे रोजी रुग्णालयामधून डिसचार्ज मिळाल्यानंतर रूग्णाचे नातेवाईक रूग्णाला माढा तालुक्यातील वरवडे या सासुरवाडीला घेऊन आले. तत्पूर्वी रूग्णाच्या नातेवाईकांनी कोरोना ग्रामसमिती, वरवडे गावच्या सरपंच आशा गायकवाड यांना संबंधित रूग्णाला वरवडे येथे आणणार असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे रूग्ण आल्यानंतर प्रथम परिते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केली व हातावर शिक्का मारून रूग्णास होम क्वारंटाईन केले होते. पुणे येथून या रूग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पलंगे, आरोग्य विस्तार अधिकारी वसंतराव पोतदार, परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती भारती, डॉ. निता खरबडे, विजयश्री दुधाळ, शोभा पवार, आरोग्य सहाय्यक अनिल गरड, व्ही. डी. वास्ते तसेच मंडल अधिकारी बी. एन. सुरवसे, तलाठी ज्ञानेश्वर बोराडे, ग्रामसेवक कालिदास मोहिते, विकास सोसायटीचे सचिव भाऊसाहेब गायकवाड, कृषी सहाय्यक सुनिल चोपडे हे तातडीने वरवडे येथे आले. कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण व त्याच्या निकट सहवासात असलेली त्याची पत्नी व मुलाला रूग्णावाहिकेतून त्वरीत सोलापूर येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी पाठविले.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खबरदारीचा उपाय...

माढा तालुक्यात अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण सापडलेला नाही. पुण्याहून आलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह आहे. वरवडे येथे आल्यापासून हा रूग्ण होम क्वारंटाईन होता. त्याची पत्नी व मुलाशिवाय येथील दुसरे कोणीही या रूग्णाच्या संपर्कात आलेले नाहीत ही एक जमेची बाजू आहे. तरी देखील रूग्ण, त्याची पत्नी व मुलगा यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी हलविले आहे. शिवाय त्याच्या नातेवाईकांपैंकी सहा महिला, एक पुरूष व एका लहान मुलास खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन केले आहे. वरवडे येथे 485 घरे असून आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर याचे पथक तयार करून गावातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 
-डॉ. प्रशांत पलंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी 

पहिल्यापासून दक्षता....
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यापासून दक्षता घेतली आहे. पुणे व मुंबई सारख्या कोरोना बाधित शहरातून कोणी गावाकडे आल्यास त्याची तातडीने माहिती देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले होते.या रूग्णाच्या बाबतीत ग्रामस्थांनी वेळीच सतर्कता दाखवून माहिती दिल्याने परिते प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून रूग्णास होम क्वारंटाईन केले होते. तसेच त्याच्या नातेवाईकांना रूग्णाच्या संपर्कात न राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाही. नागरिकांनी घाबरून जावू नये 
- आशा गायकवाड, सरपंच वरवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com