कोरोनामुळे लांबणीवर पडलेला हळदीचा हंगाम सुरू 

Corona starts the delayed turmeric season
Corona starts the delayed turmeric season

चारे (ता. बार्शी, जि. सोलापूर) : कोरोनाच्या धास्तीमुळे लांबणीवर पडलेला चारे (ता. बार्शी) परिसरातील हळदी शिजविण्याचा हंगाम चौथ्या टाळे बंदीच्या काळात थोडा फार चालू झाल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटत आहे. चारे व परिसरातील बोरगाव, वालवड, शिराळे, धानोरे, पिंपळवाडी, पाथरी या गावातील शेतकरी गेल्या दोन ते तीन पिढ्यापासून हळद पिकाची लागवड करतात. पण मागील आठ दहा वर्षांपासून अनेक संकटाच्या मालिकांनी हतबल होऊन या परिसरातील शेतकऱ्यांनी आपले हळद लागवड क्षेत्र कमी केले तर काही शेतकऱ्यांनी हळद पिक घेणं बंद केले आहे. 
परिसरात सिंचनासाठी विहीर, तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी दहा महिन्यांत येणाऱ्या हळद पिकास पसंती देतात. कारण शेतकऱ्यांना सध्या तरी बारा महिने पाण्याचे खात्रीशीर स्रोत उपलब्ध नाहीत. हळद पिकाची लागवड जून महिन्यात करतात. यासाठी शेलम, बार्शी, राजापुरी या जातीच्या हळदीच्या वाणाची लागवड करतात. एकरी 30 ते 35 क्विंटल उतारा पडतो. सरी पद्धतीने लागवड केली जाते. आठवड्याला पाणी द्यावे लागते. शेणखत असेल तर पिक जोमाने वाढते. शेणखताबरोबरच शेतकरी रासायनिक खतांची मात्रा देतात. सध्या काही शेतकरी आधुनिक पद्धतीने भोदावर ठिबक सिंचन करुन हळद पिकाची लागवड करताना दिसतात. शेंगा, गड्डा, अंगठा अशा स्वरूपात हळदीचे बी असते. हळद पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर हळद जमिनीतून खोदून काढावी लागते. यातूनच पुढील वर्षासाठी बी निवडतात. घरात हे बी लिंपन करून ठेवतात. कडक उन्हापासून त्यास जपावे लागते. राहिलेली हळद कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रेशर कुकरमध्ये शिजविली जाते. जून्या काळात हे काम फार जीकीरीचे होते. मोठ्या आकाराच्या मातीत बांधलेल्या चुलवणावर कढई ठेवून त्यात पारंपरिक पद्धतीने हळद शिजवली जात असे. शिजवण्यासाठी इंधन म्हणून तुरीच्या तुराट्या, वाळलेल्या काटेर झुडुपांचा वापर केला जात असे. हळद कढईत टाकून त्यात पुरेसे पाणी घालून लवकर शिजावी म्हणून चिखलमातीच्या साह्यने लिंपत. त्यामुळे मोठ्या आकाराचे पारंपारिक प्रेशर कुकर तयार होत असे. पण नविन विकसित प्रेशर कुकरमुळे वेळ व इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. शिजवलेली हळद बारा दिवस उन्हात वाळवून त्याची प्रतवारी करून विक्री केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com