सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाने घेतले आज सर्वाधिक 13 बळी 

सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाने घेतले आज सर्वाधिक 13 बळी 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रोजच मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आतापर्यंत सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आज 340 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एकूण दोन हजार 937 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 597 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 12 हजार 849 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 373 एवढी झाली आहे. 

आज मोडनिंब (ता. माढा) येथील 85 वर्षाचे पुरुष, कोर्टाजवळ मेटकरी गल्ली मंगळवेढा येथील 78 वर्षाचे पुरुष, नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील 46 वर्षांची महिला, सिद्धार्थनगर कुर्डूवाडी येथील 40 वर्षाची महिला, उपळे दुमाला (ता. बार्शी) येथील 51 वर्षाचे पुरुष, भांबेवाडी (ता. मोहोळ) येथील 68 वर्षाची महिला, बारंगुळे प्लॉट बार्शी येथील 52 वर्षांचे पुरुष, सरपडोह (ता. करमाळा) येथील 65 वर्षाचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 64 वर्षांचे पुरुष, कासेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष तर बागवान गल्ली अक्कलकोट येथील 60 वर्षाची महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 

या गावात आढळले नव्याने कोरोनाबाधित रुग्ण 
अक्कलकोट तालुक्‍यातील अरळी, कलकर्जाळ, खासबाग गल्ली, समर्थ नगर, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, बारबोले प्लॉट, बावी, चारे, दत्त बोळ, डावणे गल्ली, देवगाव, धनगर गल्ली, धर्माधिकारी प्लॉट, धस पिंपळगाव, फफळवाडी, गाडेगाव, हळदुगे, हिंगणी, जामगाव रोड, जावळे प्लॉट, कासार गल्ली, कासारवाडी रोड, कतले प्लॉट, काझी गल्ली, कुर्डूवाडी रोड, महावीर मार्ग, मळेगाव, नाईकवाडी प्लॉट, नाळे प्लॉट, पिंपळगाव, राऊत चाळ, साकत, सौंदरे, शनीमंदिर, शिवाजी नगर, शिवशक्ती मैदान, सोलापूर रोड, सोमवार पेठ, स्टेशन रोड, सुभाषनगर, सुर्डी, ढेमरेवाडी, उपळाई रोड, वैराग,व्हणकळस प्लॉट, वाणी प्लॉट, करमाळा तालुक्‍यातील जाधव प्लॉट, जेऊर, केडगाव, खडकपुरा, कोर्टी, कृष्णाजी नगर, मेन रोड करमाळा, पोमलवाडी, रावगाव, साडे, संभाजीनगर, सांगवी नंबर एक, सांगवी नंबर दोन, सावन गल्ली, शिवाजी नगर, सिद्धार्थ नगर, उमरड, वेताळ पेठ, माढा तालुक्‍यातील भोसरे, कुर्डू, कुर्डूवाडी, मोडनिंब, घाटणे जिल्हा परिषद शाळेजवळ, रोपळे कव्हे, सापटणे, शेंडेवाडी, तांबवे, टेंभुर्णी, तुळशी, वडशिंगे, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बागेचीवाडी, चाकोरे, दहिगाव, फोंडशिरस, कुरभावी, मानकी, नातेपुते, पिलीव, संग्रामनगर, वेळापूर, वाघोली, यशवंनगर, झिंजेवस्ती, मंगळवेढा तालुक्‍यातील ब्रह्मपुरी, दामाजी नगर, घोडके हॉस्पिटल, सलगर बुद्रुक, शेळवेवाडी, मोहोळ तालुक्‍यातील भोयरे, हिंगणी निपाणी, कुरुल, नजीक पिंपरी, परमेश्वर-पिंपरी, समर्थनगर, सिकंदर टाकळी, पंढरपुरातील भाई चौक, भंडीशेगाव, भोसे, चळे, गादेगाव, गाताडे प्लॉट, इसबावी, कडबे गल्ली, कालिका देवी चौक, करकमब, कौठाळी, खर्डी, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, मयुरेश आपारमेंट, मुंढेवाडी, मुक्ताई मठाजवळ, तनपुरे मठाजवळ, पिराची कुरोली, रुक्‍मिणीनगर, शेंडगेवाडी, सब जेल पंढरपूर, तानाजी चौक, नारायण झोपडपट्टी, वाखरी, सांगोल्यातील देशपांडे गल्ली, घेरडी, जुजारपूर, जुनोनी, कवठेमहांकाळ, खडतरे गल्ली, कोळा, लक्ष्मी नगर मिरज रोड, मेथवडे, मुजावर गल्ली, नवीन इंग्लिश शाळेजवळ, पुजारवाडी, ग्रामीण रुग्णालय क्वार्टर, संजय नगर झोपडपट्टी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चेट्टीनाड सिमेंट कंपनी होटगी या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी उत्तर सोलापूर तालुक्‍यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com