सोलापुरात कोरोनाचे ४४ दिवसात ६३ बळी; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६२४

Corona virus dead 63 in 44 days in Solapur
Corona virus dead 63 in 44 days in Solapur

सोलापूर : कोरोनाचा पहिला रुग्ण सोलापुरात १२ एप्रिलला सापडला होता. आज जवळपास ४४ दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ६२४ इतकी झाली आहे. आजच्या अहवालानुसार १६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्यापही ४४१ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये १० पुरुष तर सहा स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण पाच जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्यामध्ये तीन पुरुष व दोन स्त्रियांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झाल्याने आज दोघांनी घरी सोडण्यात आले. आज १५१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १६ जण पाॅझिटिव्ह आढळून आले तर १३५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
१६ जण पाॅझिटिव्ह आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ६२४ इतकी झाली आहे. आतापर्यंत मयत झालेल्या व्यक्तीची संख्या ६३ इतकी झाली आहे. आज मयत झालेल्या व्यक्ती कुबार्न हुसेन नगर, कणिर्कनगर, उत्तर कसबा, जुना विडी घरकुल, समाधाननगर अक्कलकोट रोड परिसरातील आहेत. आतापर्यंत २७९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. 

बार्शी तालुक्यात जामगावमध्ये आढळला सारीचा रुग्ण
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या १६ जणांमध्ये जामगाव (ता. बार्शी) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्या व्यक्तीला सारीची लागण झाली आहे. याशिवाय गीतानगर, दाजीपेठ, न्यू बुधवार पेठ, रेल्वे लाईन, बाळीवेस, भवानीपेठ, मराठावस्ती-भवानीपेठ, एमआयडीसी रोड, पाच्छापेठ, कुमठा नाका या परिसरातील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com