कोरोना.... `या` शहरातील तीनजण निगराणीत 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सोलापूर शहरात परतलेल्या तिघांना महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. आम्ही त्यांच्याशी सतत संपर्कात आहोत. त्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. 
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

सोलापूर : कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झालेल्या चीनमधील वुहान शहरातून महाराष्ट्रातील 36 जण स्वगृही परतले आहेत. त्यामध्ये सोलापूर शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, त्यांना सध्या महापालिका आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 

हे आधी वाचा - कोरोनाची भीती नको, दक्षता हवी 

या सर्वांना नवी दिल्लीतील आयटीबीबी आणि मानसेरमधील आर्मी कॅंपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता घरी सोडण्यात आले आहे. हे सर्वजण 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली होते. त्यांची कोरोना व्हायरची चाचणी नकारात्मक आली आहे. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला फिरण्यास किंवा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परत जाण्यास कोणतेही बंधन नाही. तथापि, राज्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी मोबाईलवरून सतत संपर्कात आहेत. 

हेही वाचा -  अहवालात नाव असलेले आमदार देशमुख म्हणतात

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात परतलेल्या 36 जणांमध्ये सोलापूरसह मुंबई व जळगाव येथील प्रत्येकी तीन, ठाणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर आणि नाशिक येथील प्रत्येकी दोन; आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे. या सर्वांना स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तसेच स्थानिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत, असे आरोग्य विभागातील राज्य सर्व्हेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus three suspected in solapur