शहरातील 'हा' प्रभाग झाला कोरोनामुक्‍त ! एकूण 17 प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर; दहा प्रभाग रेड झोनमध्येच 

तात्या लांडगे
Saturday, 7 November 2020

'जनता कर्फ्यू'प्रभाग 19 झाला कोरोनामुक्‍त 
प्रारंभी सर्वाधिक रुग्णांमध्ये हा प्रभाग अग्रस्थानी होता. त्यानंतर या प्रभागातील आजी- माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जनता सुरक्षित राहावी, या हेतूने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या पुढारातून 14 दिवसांचा शहरातील पहिला जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. निलम नगर आणि विनायक नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. सभागृह नेता श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, वरलक्ष्मी पुरुड, अनिता कोंडी यांनी एकत्रितपणे काम केले. दोनवेळा जनता कर्फ्यू लागू केला. त्यात नागरिकांनी उर्त्स्फूतपणे प्रतिसाद नोंदविला. गुरुशांत धुत्तरगावकर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून फिव्हर ओपीडी, ऍन्टीजेन टेस्ट घेतली. आरोग्य शिबिरे, डॉ. हिरालाल अग्रवाल, डॉ. महेश भंडारी यांनी मोफत औषधे उपलब्ध करुन दिल्या. त्याचवेळी जनजागृतीवर भर दिली. त्यामुळे प्रभाग 19 हा कोरोनामुक्‍त झाला असून त्यात आता सातत्य राहण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

सोलापूर : शहरातील नऊ हजार 759 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 541 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील दहा प्रभाग अद्यापही रेड झोनमध्येच आहेत. दुसरीकडे आनंदाची बाब म्हणजे शहरातील प्रभाग 19 (ग्रीन झोन) हा कोरोनामुक्‍त झाला असून 26 प्रभागांपैकी तब्बल 16 प्रभाग रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये पोहचले आहेत. या 16 प्रभागांमध्ये सद्यस्थितीत 103 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळूनही सोलापूर कोरोनापासून दूरच होते. मात्र, 12 एप्रिलला शहरातील पाच्छा पेठेत पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर शहरात कोरोनाचा कहर वाढून शहर राज्याच्या पटलावरच नव्हे तर देशाच्या टॉपटेन यादीत पोहचले. शहरात रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक झाल्याने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी सोलापुरातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सोलापूर शहराबाबत विशेष बैठक घेतली. तत्कालीन आयुक्‍त दिपक तावरे यांच्या माध्यमातून म्हणावे तितके प्रयत्न न झाल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. सध्याचे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी खासगी रुग्णालयांसह डॉक्‍टरांबद्दल स्वतंत्र आदेश काढले. अनेकांवर कारवाई करीत महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात हयगय केल्याने त्यांच्यावर वेतनवाढ थांबविण्याची कारवाई केली. शहरातील शिक्षकांना को- मॉर्बिड रुग्णांच्या सर्व्हेसाठी नियुक्‍त केले. आता शहरातील 16 प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून त्यातील सात प्रभागांतील रुग्णसंख्या पाचपेक्षाही कमी आहे. प्रभाग 25 मध्ये 11 रुग्ण असून प्रभाग 15 आणि 16 मध्ये प्रत्येकी 14 रुग्ण राहिले आहेत. 

'हे' प्रभाग होताहेत कोरोनामुक्‍त 
         प्रभाग  ऍक्‍टिव्ह रुग्ण  मृत्यू 

 • 1           5                 25 
 • 2          12                16 
 • 4           6                  18 
 • 10         7                  21 
 • 11         5                  12 
 • 12         4                   15 
 • 13         6                   21 
 • 14         7                   25 
 • 17         5                   18 
 • 18         6                   15 
 • 19         0                   10 
 • 20         5                  16 
 • 22         6                   11 

'जनता कर्फ्यू'प्रभाग 19 झाला कोरोनामुक्‍त 
प्रारंभी सर्वाधिक रुग्णांमध्ये हा प्रभाग अग्रस्थानी होता. त्यानंतर या प्रभागातील आजी- माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जनता सुरक्षित राहावी, या हेतूने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत पाटील यांच्या पुढारातून 14 दिवसांचा शहरातील पहिला जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. निलम नगर आणि विनायक नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग वाढला नाही. सभागृह नेता श्रीनिवास करली, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, वरलक्ष्मी पुरुड, अनिता कोंडी यांनी एकत्रितपणे काम केले. दोनवेळा जनता कर्फ्यू लागू केला. त्यात नागरिकांनी उर्त्स्फूतपणे प्रतिसाद नोंदविला. गुरुशांत धुत्तरगावकर व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून फिव्हर ओपीडी, ऍन्टीजेन टेस्ट घेतली. आरोग्य शिबिरे, डॉ. हिरालाल अग्रवाल, डॉ. महेश भंडारी यांनी मोफत औषधे उपलब्ध करुन दिल्या. त्याचवेळी जनजागृतीवर भर दिली. त्यामुळे प्रभाग 19 हा कोरोनामुक्‍त झाला असून त्यात आता सातत्य राहण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. 

रेड झोनमधील प्रभागांची स्थिती 

 प्रभाग       ऍक्‍टिव्ह रुग्ण        मृत्यू 

 • 3        17              39 
 • 5        32              22 
 • 7        16              30 
 • 8        16              32 
 • 9         24             20 
 • 21       32            28 
 • 23       33            22 
 • 24       51            33 
 • 26       18            21  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona went through the 19th ward of the solapur city! 16 wards of the city are getting rid of corona virus