esakal | स्मार्ट जमान्यात वाढतेय "स्मार्ट वॉच' ची क्रेझ 

बोलून बातमी शोधा

smart watch 2.jpg}

एकदा मोबाईल ब्लूटुथने कनेक्‍ट केले की इनकमिंग कॉल, मेसेज, नोटिफिकेशन्स याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत सर्व माहिती मिळते. ब्लड प्रेशर, तुम्ही किती कॅलरी बर्न करता, तुम्ही दिवसभरात किती अंतर चालता, तुमचा हर्ट रेट, स्ट्रेस लेव्हल अशा सर्व गोष्टी या सहजासहजी आपल्याला पाहता येतात. 

solapur
स्मार्ट जमान्यात वाढतेय "स्मार्ट वॉच' ची क्रेझ 
sakal_logo
By
अनुराग सुतकर

सोलापूर ः तंत्रज्ञानाच्या विकासामुळे तरूणांमध्ये वेळोवेळी नवनवीन गॅझेटचे क्रेझ वाढत जात आहे. आता चालू ट्रेंडमध्ये तरूण-तरूणींच्या हातातील स्मार्ट वॉच हा आकर्षणाचा विषय ठरत आहे. फिटबॅंड असो की स्मार्ट वॉच हा डिजिटल वॉचचा प्रकार आहे. त्या घड्याळात तुम्ही फक्त वेळच नाही, तर जे फिचर्स तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता, असे सर्व फिचर्स तुम्ही पाहू शकता. एकदा मोबाईल ब्लूटुथने कनेक्‍ट केले की इनकमिंग कॉल, मेसेज, नोटिफिकेशन्स याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत सर्व माहिती मिळते. ब्लड प्रेशर, तुम्ही किती कॅलरी बर्न करता, तुम्ही दिवसभरात किती अंतर चालता, तुमचा हर्ट रेट, स्ट्रेस लेव्हल अशा सर्व गोष्टी या सहजासहजी आपल्याला पाहता येतात. 
एवढेच नव्हे तर स्मार्टवॉच प्रकारातील सेल्युलर या प्रकारात तर चक्क आपण मोबाईल घरात जरी चार्जला लावून कुठेही गेलो तरी हातातील स्मार्ट वॉचमार्फत आपणाला कोणाचा कॉल आला, हे तर कळेलच आणि त्यामार्फत आपण तो कॉल रिसिव्ह करून आपण बोलू शकतो. याचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. कारण त्या खेळाडूंना फिटनेस वारंवार चेक करावा लागणार नाही. या घड्याळ प्रकारात आपण जेव्हा वेळ पाहण्यासाठी घड्याळाकडे पाहतो तेव्हाच त्याचा डिस्प्ले बोर्ड ऑन होतो. इतरवेळी तो बंद असतो आणि त्याला एकदा चार्जिंग केले तर जवळपास दहा ते पंधरा दिवस राहू शकते. त्यामुळे वेळोवेळी सेल बदलण्याचा त्रासही वाचला आहे. पारंपारिक पद्धतीचं घड्याळ बनविणाऱ्या कंपन्या आता स्मार्ट वॉच बनविण्यासाठी आग्रही आहेत. तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काळात मोबाईलची जागाही स्मार्ट वॉच घेईल, ही शक्‍यता टाळता येणार नाही. 


मोठ्या प्रमाणात मागणी
स्मार्ट वॉचला सध्या बाजारात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे याकडे तरूणांचा कल जास्त आहे. विविध कंपन्या आहेत. विदेशी कंपन्यांकडे तरुणाईचा अधिक कल आहे. 
- विजय जग्यानी, आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स 

सर्व फिचर्स स्मार्ट वॉचमध्ये
मोबाईलमधील सर्व फिचर्स हे आता स्मार्ट वॉचमध्ये पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे पारंपारिक वॉचच्या तुलनेत वजनाने हलके असल्याने याला जास्त पसंती दिली जात आहे. 
-सचिन रामजगले, समृद्धी इलेक्‍ट्रॉनिक्‍स 

नवीन टेक्‍नॉलॉजीच्या शोधात
तरूणाई ही नेहमी काहीतरी नवीन टेक्‍नॉलॉजीच्या शोधात असते. त्यामुळे त्यांना स्मार्ट वॉच या आधुनिक घड्याळाच्या प्रकाराला जास्त पसंती दर्शविली जात आहे. 
-रमेश गायकवाड, टेक्‍निकल एक्‍स्पर्ट