#Lockdown : दुसऱ्यांच्या वाहनांत पेट्रोल भरणाऱ्या महापालिकेच्या कामगारांवर गुन्हा

#Lockdown : दुसऱ्यांच्या वाहनांत पेट्रोल भरणाऱ्या महापालिकेच्या कामगारांवर गुन्हा

सोलापूर : संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्‍यक सेवेसाठी दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन दुसऱ्यांच्या वाहनांत पेट्रोल भरणाऱ्या महापालिकेच्या दोघा कंत्राटी कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने 27 ते 31 मार्च या कालावधीत एकूण 74 जणांवर कारवाई केली आहे. 

जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री

रवी चंद्राम म्हेत्रे (वय 33, रा. उत्तर सदर बाझार, सोलापूर), आकाश शंकर पेद्दी (वय 23, रा. शास्त्रीनगर, सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. असे असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून काही नागरिक विनाकारण रस्त्याने फिरत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंच्या शिवाय इतरही दुकाने चालू ठेवत आहेत. या प्रकरणात 27 ते 31 मार्च या कालावधीत गुन्हे शाखेने एकूण 74 जणांवर कारवाई केली आहे. यापैकी 11 जणांची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आदेश धाब्यावर ; सोलापूरकर रस्त्यावर

सोलापूर महानगरपालिकेकडे कंत्राटी कामगार म्हणून सेवेत असलेले रवी म्हेत्रे आणि आकाश पेद्दी हे दोघे कर्तव्यासाठी सूट असल्याचा गैरफायदा घेऊन इतरांच्या दुचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com