शहरातील मृत्यू थांबले ! आज 25 नवे कोरोना पॉझिटिव्ह; आता उरले 429 रुग्ण

तात्या लांडगे
Sunday, 29 November 2020

ठळक बाबी...

  • शहरातील एक लाख 21 हजार 235 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 360 कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी नऊ हजार 370 जणांनी केली कोरोनावर मात
  • आतापर्यंत शहरातील सहा हजार 134 पुरुषांना तर चार हजार 226 महिलांना कोरोनाची बाधा
  • शहरात आता उरले 262 पुरुष आणि 187 महिला रुग्ण

सोलापूर : शहरातील मृतांची संख्या पूर्णत: कमी झाली असून मागील तीन दिवसांत एकही रुग्ण कोरोनामुळे दगावलेला नाही. वेळेत उपचार घेतल्याने रुग्णांचा मृत्यूदर आता कमी होऊ लागला असून आज शहरात 25 नव्या रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे 34 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता शहरातील अवघे 429 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

ठळक बाबी...

  • शहरातील एक लाख 21 हजार 235 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 360 कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी नऊ हजार 370 जणांनी केली कोरोनावर मात
  • आतापर्यंत शहरातील सहा हजार 134 पुरुषांना तर चार हजार 226 महिलांना कोरोनाची बाधा
  • शहरात आता उरले 262 पुरुष आणि 187 महिला रुग्ण

 

शहरात आज गडगी नगर (हैदराबाद रोड), कित्तूर चन्नमा नगर, साई हाईट्‌स (सैफूल), आयटीआयजवळ, सदिच्छा नगर (विजयपूर रोड), वामन नगर, गोकूळ नगर (जुळे सोलापूर), सह्याद्री सोसायटी (विकास नगर), द्वारका विहार (रुपाभवानी रोड), दत्त नगर, सुमय्या नगर (नई जिंदगी), मुदगल बागेजवळ (न्यू पाच्छा पेठ), वसंत विहार (जुना पुना नाका), जुना अक्‍कलकोट नाका, आयडीएल शाळेजवळ, मोहिते नगर (होटगी रोड), मोदीखाना, मराठा वस्ती (भवानी पेठ) आणि हरिभाई देवकरण प्रशालेमागे आज रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 107 संशयित होम क्‍वारंटाईन आहेत. तर 48 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये तर 53 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दुसऱ्या लाटेच्या दृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता ठोस कृती आराखडा तयार केला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील सरकारी व खासगी डॉक्‍टरांची बैठक पार पडली. त्यानुसार रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तर दुसरीकडे डिसेंबरपासून घरोघरी फेरसर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात को- मॉर्बिड रुग्णांवर वॉच ठेवला जाणार असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. बिरु दुधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death in the city stopped! Today 25 new corona positive; Now the of solapur citys 429 patients