उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोविंद वृद्धाश्रम इमारतीचे लोकार्पण 

Mohite Patil
Mohite Patil

अकलूज (सोलापूर) : उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांना समाजकार्याची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोरगरीब व गरजूंना मदत केली. त्यांच्या पश्‍चात त्यांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह मोहिते-पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तिध्वजसिंह मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतात. यावर्षी श्रीश्रेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमास पक्‍क्‍या बांधकामाच्या खोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. 

उद्योग महर्षी (कै.) उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवीत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावर्षी गोविंद वृद्धाश्रमास इमारतीसह शौचालय, दहा बेड, गाद्या व इतर सर्व उपयुक्त साहित्य मदत म्हणून देण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवशंकर बझारच्या अध्यक्षा स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, शिवरत्न उद्योग समूहाचे कीर्तिध्वजसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, राजेंद्र घोरपडे, गोविंद वृद्धाश्रमचे भाऊ देशमुख, कृष्णात बोबडे, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या आनंदनगर येथील शक्तिस्थळावर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दोन लाखांचा विमा 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिवाची पर्वा न करता अकलूज ग्रामपंचायतीचे कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत, याची जाणीव ठेवून सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी कै. उदयसिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन लाखांच्या आरोग्य विम्याचे संरक्षण दिले आहे. त्यासंबंधीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

उदयनगर येथे कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अपंग बांधवांना माजी सरपंच सतीश शिंदे यांच्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या वेळी स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, नितीन खराडे, अनिल जाधव, चौंडेश्वरीवाडीचे सरपंच संजय कडाळे, उपसरपंच दत्तात्रय माने-देशमुख, सदस्य शहाजी गायकवाड आदी उपस्थित होते. या वेळी कोरोना महामारीत अहोरात्र झटणारे कोरोनायोद्धे डॉक्‍टर व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com