हाथरस अत्याचार घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 1 October 2020

हाथरस जिल्हयातील या घटनेत पिडीतेची जीभ कापली व मणक्‍याचे हाडदेखील मोडण्यात आले. बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली होती, तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र ती वाचू शकली नाही. अखेर तिचा मंगळवारी (ता.29) सकाळी मृत्यू झाला. 

सोलापूर ः उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरातील एका गावातील 19 वर्षीय पीडितेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधात येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

हेही वाचाः यूट्युबच्या माध्यमातून दिले मराठीतून गणिताचे धडे 

हाथरस जिल्हयातील या घटनेत पिडीतेची जीभ कापली व मणक्‍याचे हाडदेखील मोडण्यात आले. बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली होती, तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र ती वाचू शकली नाही. अखेर तिचा मंगळवारी (ता.29) सकाळी मृत्यू झाला. 

हेही वाचाः आदर्श ने केली प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश वाटपाची मागणी 

यातील सर्व नराधमांना आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच पिडीत मुलीचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरच्याला दिला नाही. पोलिसांनी स्वतः अंत्यविधी केला आणि सर्व पुरावे नष्ट करायचा प्रयत्न पोलिसांनी केला. अशा सर्व पोलिसांवर तात्काळ कारवाई करून त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणी करण्यात आले. 
तरी सर्व नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला कार्यकारणी सदस्य अंजली गायकवाड, जिल्हाध्यक्ष नाना कदम, शहर महिला अध्यक्ष ज्योतीताई गुरुसिद्धाप्पा बमगोंडे, महिलाआघाडी सचिव मंदाकिनी शिंगे, उपाध्यक्ष पल्लवी सुरवसे, उपाध्यक्ष सुजाताताई वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष बबन शिंदे, महासचिव जावेद पटेल, सहसचिव अनुरुद्ध वाघमारे, सचिव हेमलता वाघमारे, शहर युवा अध्यक्ष गौतम चंदनशिवे, गुरुसिद्धाप्पा (विजय) बमगोंडे, सहसचिव सुहास सावंत, शहर सचिव रवी थोरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deprived Bahujan Aghadi movement in protest of Hathras atrocities