ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी संवाद व गीतांनी रंगला सुमन सुगंध 

suman kalyanpur1.jpg
suman kalyanpur1.jpg

सोलापूर ः त्या केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.......सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले.....निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई या सारख्या भावगिते, भक्तीगीत, लोरी गिताच्या सोबत आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर या सारख्या उडत्या चालीच्या हिंदी गितांच्या सोबतीने सुमन कल्याणपूर यांच्या मुलायम स्वरांचा आगळा प्रवास रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला.सोलापूरच्या कलावंतानी त्यांची गीते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

प्रिसिजन दिवाळी गप्पा 2020 ची सुरुवात सुमन कल्याणपुर यांच्या संवाद व गीतमैफलीने आज झाली. प्रिसीजनच्या डॉ.सुहासिनी शहा यांनी या वर्षी दिवाळी गप्पा उपक्रमाचे तपपुर्ती वर्ष असल्याने कोरोना संकटात देखील रसिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने हा उपक्रम अखंड ठेवल्याचे सांगितले. सुप्रसिध्द गायीका सुमन कल्याणपूर यांच्यासोबत त्यांचा गायकीचा प्रवास गायिका मंगला खाडीलकर यांनी सादर करताना त्यांच्या व्यक्तीमत्व, आठवणी व गायकीची शैली नुसती उलगडली नव्हे तर त्यातील अनेक प्रसंग मांडले. 

1968 मध्ये गायलेले तुझ्या कांतीसम रक्तपताका हे भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भावगीतांच्या गायकीचा त्यांचा हा पैलू संगीतकार दशरथ पुजारी व नंतर अशोक पत्की यांच्या संगीतातून बहरला. जीथे सागरा धरणी मिळते हे गाणे हे केवळ सुमन कल्याणपूर गातील हे अगदी ठाम ठरलेले होते. 
केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर, वाट इथे स्वप्नातली संपली जणू या गीतांनी मराठी गायनात सुमन कल्याणपूर यांची भावगीतावर मोहर उमटली. 1969 मध्ये सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला या सारख्या गीतांनी द्वंद गीताचे पर्व समोर आले. संगीतकार शंकर जयकिशन यांनी सोनेसी परी मेरी लाडली हे लोरी गीत तर मराठीतील बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील निंबोनीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई या अंगाई गिताने वेगळी उंची गाठली. बाबूजी सोबत अनेक द्वंदगीते त्यांनी गायीली. म.रफीसोबत आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे जुबानपर अशी उडत्या चालीची गिते देखील गायली. ना तुम हमे जानो ना हम तुम्हे जाने अशी मेलडी गीत तेवढयाच ताकदीने गायले. या वेळी त्यांची गीते गायीका माधुरी करमरकर, गायक व संगीतकार मंदार आपटे, विद्या करलगीकर, प्रशांत लळीत आदी कलावंतानी सादर केली. या कलावंतानी सुमन कल्यापूर यांच्या गायकीची नजाकत तेवढ्याच ताकदीने पेश केली. त्यांच्या या गायनाला देखील रसिक सातत्याने दाद व कौतुक करत होते. एका अर्थाने प्रिसीजनच्या दिवाळी गप्पान 


सोलापूरचे गीतकार रा.ना.पवार यांची आठवण 
एचएमव्ही ने दशरथ पुजारी व सुमन कल्याणपूर यांच्या गाण्याची रेकार्ड काढणयाचे ठरवले. तेव्हा सोलापूरचे गितकार रा.ना.पवार भक्तीगीत त्यामध्ये समाविष्ट झाले. त्यांनी लिहिलेले सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले हे गीताचा त्यात समावेश होता.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com