सोलापुरसाठी खुशखबर...जिल्हा रुग्णालय पूर्ण होणार दिड वर्षात 

district hospital
district hospital

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरावस्था अन्‌ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव, यामुळे रुग्णांचा सर्व भार श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर पडू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात 100 बेडच्या जिल्हा रुग्णालय बांधकाम सुरु असून पहिला मजला पूर्ण झाला आहे. मार्च 2021 पर्यंत जिल्हा रुग्णालयाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाला दिला जाणार आहे. 


सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके असून जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 42 लाखांपर्यंत आहे. तरीही जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा रुग्णालय नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन पालमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून जिल्हा आणि स्त्री व बालरुग्णालय मंजूर झाले. त्यासाठी 150 कोटींचा निधीही मंजूर झाला. जुन्या मेडिकल कॉलेज परिसरात हे रुग्णालय सुरु होणार असून त्यामध्ये 100 बेडची एक स्वतंत्र इमारत स्त्री (प्रसुती) व बालरुग्ण विभागाची असणार आहे, तर दुसऱ्या इमारतीत 100 बेड असणार आहेत. जिल्हा रुग्णालयात सर्व आजारांवरील रुग्णांवर उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहता जिल्हा रुग्णालयाचे काम दिड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचेही ते म्हणाले. 

ठळक बाबी... 

  • जिल्हा रुग्णालय (100 बेड) व प्रसुती व बालरुग्णसेवा रुग्णालय (100 बेड) अशी दोन रुग्णालये होणार 
  • दोन्ही रुग्णालयासाठी 150 कोटींचा निधी मंजूर : पहिल्या मजल्याचे काम पूर्ण 
  • मार्च 2021 पर्यंत दोन्ही रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन 
  • बालरुग्णसेवा रुग्णालयात बालकांसाठी मनोरंजनाचीही असणार सोय : रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुसज्ज प्रतीक्षालयही 
  • इमारतींचे बांधकाम 80 टक्‍के पूर्ण झाल्यानंतर डॉक्‍टरांसह अन्य पदांना मिळणार मंजुरी : प्रस्ताव तयार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com