
"सकाळ' महिलांसाठी "सोलापूरच्या पारंपरिक खाद्य संस्कृती'वर दिवाळी अंक काढत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांना आपल्या रेसिपी पाठवण्याचे आवाहन "सकाळ'च्यावतीने करण्यात आले आहे.
सोलापूर ः सोलापूरचे पर्यटन वाढावे तसेच येथील खाद्य पदार्थांना मागणी वाढावी, त्यातून येथील रोजगार व उद्योगाची भरभराट व्हावी, यासाठी "सकाळ'ने आगामी वर्षात पर्यटनावर विशेष भर देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील अध्यात्मिक स्थानांचे महत्त्व विषद करतानाच सातासमुद्रापार ख्याती मिळविलेल्या व प्रकृतीस पाचक अशा खाद्य संस्कृतीचा दबदबा आणखी वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दिवाळी अंकात सोलापूरच्या खाद्य संस्कृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. "सकाळ' महिलांसाठी "सोलापूरच्या पारंपरिक खाद्य संस्कृती'वर दिवाळी अंक काढत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांना आपल्या रेसिपी पाठवण्याचे आवाहन "सकाळ'च्यावतीने करण्यात आले आहे.
महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सोलापूर"सकाळ'च्या वतीने नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदाचा दिवाळी अंक महिलांनी दिलेल्या रेसिपीने भरलेला असेल. रेसिपी पाठविण्यासाठी वयाची कोणतीही अट राहणार नाही. रेसिपीच्या व्हिडीओचा क्यूआर कोडही देण्यात येईल. या उपक्रमात भाग घेण्यासाठी आपल्या रेसिपीची सुवाच्च अक्षरातील लिखित कॉपी किंवा युनिकोड स्वरुपातील टेक्स्ट मजकूर, संबंधित स्पर्धकाचा फोटो, तयार पदार्थाचा फोटो या क्रमांकावर पाठवावा. संबधित रेसिपीचा एक व्हिडीओ abhaykumar.supate@esakal.com या आयडीवर मेल करायचा आहे. त्यामध्ये रेसिपीबाबतची माहिती व त्याचे विवरण ऑडिओ स्वरुपात असणे बंधनकारक राहील. व्हिडीओ किमान तीन मिनिटांचा असावा. निवडक व्हिडीओना डिजिटलवर प्रसिध्दी देण्यात येईल.
सहभाग नोंदवताय...