esakal | तुम्ही लस टोचायला जाताय का? नोंदणी नाहीतर लस नाहीच; 'अशी' करा घरबसल्या ऑनलाइन नोंदणी

बोलून बातमी शोधा

31378_20Senior_20citizens_20vaccinated_20in_20pune_20corona_20Virus.jpg

अशी करा नोंदणी 
सर्वप्रथम गुगलवर co-WIN portal सर्च करावे. त्यानंतर त्यावर क्‍लिक करावे. ते पेज ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन युवर सेल्फ असा पर्याय येतो आणि त्यावर क्‍लिक करावे. त्यानंतर मोबाइल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येतो. ओटीपी त्याठिकाणी टाकावा आणि आपली माहिती भरावी, अथवा आरोग्य सेतू म्हणून त्याठिकाणी पर्याय आहे, त्यातूनही नोंदणी करता येवू शकते. 

तुम्ही लस टोचायला जाताय का? नोंदणी नाहीतर लस नाहीच; 'अशी' करा घरबसल्या ऑनलाइन नोंदणी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील दोनशेहून अधिक ठिकाणी दररोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना वाढत असल्याने विषाणूपासून सुरक्षित राहण्याच्या हेतूने आता लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने शहरातील 27 लसीकरण केंद्रांना दररोज दीडशे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यांनाच लस द्यावी असे निर्देश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

अशी करा नोंदणी 
सर्वप्रथम गुगलवर co-WIN portal सर्च करावे. त्यानंतर त्यावर क्‍लिक करावे. ते पेज ओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन युवर सेल्फ असा पर्याय येतो आणि त्यावर क्‍लिक करावे. त्यानंतर मोबाइल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येतो. ओटीपी त्याठिकाणी टाकावा आणि आपली माहिती भरावी, अथवा आरोग्य सेतू म्हणून त्याठिकाणी पर्याय आहे, त्यातूनही नोंदणी करता येवू शकते. 

पुण्यावरून सोलापूर जिल्ह्यासाठी शुक्रवारी (ता. 9) रात्री उशिरा 19 हजार डोस प्राप्त झाले. त्यातील सात हजार तर शहरासाठी तर 11 हजार डोस प्रत्येक तालुक्‍यासाठी एक हजारांप्रमाणे वितरीत करण्यात आले. संचारबंदीत लसीकरणासाठी सवलत दिल्याने केंद्रांबाहेर गर्दी वाढल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र, उद्या (रविवारी) लस संपणार असल्याने शनिवारी प्रत्येक केंद्रांनी निम्मी लस वापरली. आता पुन्हा सोमवारी कोविशिल्ड लसीचे किमान 50 हजार डोस द्यावेत, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. कोव्हॅक्‍सिन लस केवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातच दिली जाते. उर्वरित केंद्रांवर सिरमची कोविशिल्ड लस टोचली जात आहे. शहरात 27 तर ग्रामीण भागात 99 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. एकूण 164 केंद्रांचे नियोजन करण्यात आले, परंतु लस मागणीच्या प्रमाणात मिळत नसल्याने सुरु केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रे पुन्हा बंद करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 

शहरात याठिकाणी मिळते लस 
दाराशा, रामवाडी, मजरेवाडी, साबळे, सोरेगाव, भावनाऋषी, चाकोते, देगाव, विडी घरकूल, मुद्रा सनसिटी, बाळे, सिव्हिल हॉस्पिटल, रेल्वे हॉस्पिटल, मदर तेरेसा आणि पॉलिक्‍लिनिक हॉस्पिटल याठिकाणी मोफत तर चिडगूपकर हॉस्पिटल, सिध्देश्‍वर कॅन्सर हॉस्पिटल, यशोधरा, गंगामाई, सीएनएस, अश्‍विनी, रघोजी, मोणार्क, लोकमंगल जिवक, सोलापूर सहकारी रुग्णालय, सिध्देश्‍वर मल्टिस्पेशालिटी, धनराज गिरजी हॉस्पिटल आणि युगंधर हॉस्पिटल या ठिकाणी अडीचशे रुपये देऊन लस टोचली जात आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी दिली. 

आयुक्‍तसाहेब ज्येष्ठांना नोंदणी करता येईल का? 
कोरोना वाढत असल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात दररोज सरासरी साडेचार हजार तर ग्रामीण भागात साडेआठ हजारांहून अधिक जणांना लस टोचली जात आहे. मात्र, आज (शनिवारी) लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शहरातील बहुतेक शासकीय लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवावी लागली. कोरोना वाढत असताना आणि संचारबंदी असतानाही लस टोचून घेण्यासाठी आलेल्यांना लस संपल्याने आल्या पावली परत जावे लागले. त्यातच आता आयुक्‍तांनी लस टोचायला येण्यापूर्वी संबंधितांनी ऑनलाइन नोंदणी करावी, अन्यथा लस दिली जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने ज्येष्ठांची पंचाईत होणार आहे.