मोठी बातमी ! लॉकडाउननंतर देशाअंतर्गत विमानसेवेचे ठरलं

air.jpg
air.jpg

सोलापूर : चीनमधील कोरोनाच्या विषाणूने जगभर विळखा घातला असून विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून हा विषाणू सर्वत्र पसरला आहे. या पार्श्‍वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन राहणार असून देशाअंतर्गत विमानसेवा 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्याने सुरु करण्याचे नियोजन केंद्रीय हवाई मंत्रालयाकडून सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने दिली. मात्र, त्यावेळी सॅनिटायझर, मास्क घालून सोशल डिस्टन्सचे पालन केले जाईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

कोरोना या विषाणूला हद्दपार करण्याच्या हेतूने अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, इटलीसह अन्य देशांमधील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. परदेशातील लॉकडाउन कधीपर्यंत संपणार याची माहिती घेऊन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु केली जाणार आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन असला तरीही विमानसेवा कधीपासून सुरु करायची याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. मात्र, उद्योजक, व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन 14 एप्रिलनंतर टप्प्याटप्याने देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. कोरोना या विषाणूचा विळखा वाढणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. दुसरीकडे रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवाही टप्प्याटप्यानेच सुरु केली जाणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी सांगितले. 

विमानसेवा टप्प्याटप्याने सुरु करण्याचे नियोजन​
देशाअंतर्गत विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र स्तरावरुन घेण्यात आल्याने ऑनलाइन बुकिंग सध्या बंदच आहे. देशातून परदेशात जाणारी विमानसेवा लॉकडाउननंतरही काही दिवस बंदच राहील. परंतु, 14 एप्रिलनंतर देशाअंतर्गत विमानसेवा टप्प्याटप्याने सुरु करण्याचे नियोजन असून कोणते टप्पे सुरु होणार याची माहिती काही दिवसांत दिली जाईल. 
- अनिल पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण, मुंबई 


ठळक बाबी... 

  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधीपासून सुरु होणार, अद्यापही नाही निर्णय 
  • देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन : टप्प्याटप्याने सुरु होणार विमानसेवा 
  • सॅनिटायझर, मास्क अन्‌ सोशल डिस्टन्सचे पालन करुन देशाअंतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन 
  • देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाइन बुकिंग बंदच : सुरु करण्याचा निर्णय नाही 
  • 14 एप्रिलनंतर रेल्वेसेवा सुरु करण्याचा विचार : सुरक्षित टप्प्यांचा रेल्वे मंत्रालयाकडून अभ्यास 
  • एसटी बससेवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंदच : दररोज 22 कोटींचा बसतोय फटका  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com