कोरोना : अत्यावश्यक वाहतूकीसाठी उपलब्ध होणार रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानंतर जतनतेमध्ये काही प्रमाणात बदल दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत सोलापुरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. संचारबंदीच्या काळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दुचाकीवरून किंवा अन्य वाहनाने रस्त्यांवर जाताना दिसत आहेत.

सोलापूर : संचारबंदीच्या काळात सर्वच वाहनांना रस्त्यांवर येण्यास बंदी करण्यात आली आहे. अशातच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून शहर वाहतूक शाखेने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही रिक्षांना वाहतूक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.  
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानंतर जतनतेमध्ये काही प्रमाणात बदल दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत सोलापुरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसत आहे. संचारबंदीच्या काळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दुचाकीवरून किंवा अन्य वाहनाने रस्त्यांवर जाताना दिसत आहेत. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त रुपाली दरेकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच रिक्षांना वाहतूकीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.
पोलिसांनी परवानगी दिलेल्या रिक्षांचे क्रमांक पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात आणि प्रत्येक पोलिस ठाण्यात उपलब्ध असतील. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यकतेनुसार पोलिसांकडून रिक्षांचे क्रमांक घेऊन प्रवास करावा. पोलिसांकडून देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

या नंबर करा संपर्क
संचारबंदीमुळे रिक्षासह सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी आहे. या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही काही रिक्षांना वाहतूकीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षाची आवश्यकता असेल तर पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील 02172744600 किंवा 100 या क्रमांकावर नागरिकांना फोन करता येईल. फोन केल्यानंतर रिक्षा काही वेळात रुग्णाच्या घरी जाईल, अशी ही योजना आहे.
- संतोष काणे, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा

कोरोना व्हायरस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The emergency traveling available form riksha