लॉकडाऊनच्या काळातही सोलापुरात "एमआरईजीएस'चे काम सुरु 

लॉकडाऊनच्या काळातही सोलापुरात "एमआरईजीएस'चे काम सुरु 

सोलापूर ः राज्यभर सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या कालावधीत मजुरांची उपासमार सुरु आहे. हे ओळखून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी "एमआरईजीएस' योजनेतून काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टसिंग पाळून हे काम सुरु केले आहे. त्या कामाची पाहणी आज श्री. वायचळ यांनी केली. 

लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील अल्पभुधारक शेतकरी व शेतमजूरांच्या हातास काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काम सुरु केले आहे. या योजनेतून वडजी-तांदुळवाडी (ता. दक्षिण सोलपूार) या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली. या कामावर 118 मजूरांनी उपस्थिती दर्शविली आहे. काम करणाऱ्या मजूरांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. 

सामाजिक सुरक्षा नियम पाळून रोजगार हमी योजनेच्या कामांना श्री. वायचळ यांनी परवानगी दिली. त्यानुसार प्रत्येक गावात या योजनेअंतर्गत काम सुरु करण्यात येत आहे. आज श्री. वायचळ, दक्षिणचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी वडजी-तांदुळवाडी रस्त्याच्या कामाची पाहणी करुन मजूरांशी संवाद साधला. यावेळी स्विय सहायक अविनाश गोडसे, वडजीचे सरपंच पुंडलिक कांबळे, ग्रामसेवक एस. व्ही. भोसले उपस्थित होते. 

या रस्त्याच्या कामावर एकूण 118 मजूर आहेत. यात 73 महिला तर 45 पुरुष मजूर काम करीत आहेत. मजूरांना कामानुसार तातडीने मजूरी अदा करण्यात येत असल्याचे सरपंच कांबळे व ग्रामसेवक भोसले यांनी सांगितले. काम करणाऱ्या मजूरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करुन देण्यासाठी तीन मजूर लावले आहेत. त्यांच्याकडून मजूरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय कामावर मजूरांना आरोग्याच्या प्राथमिक उपचार देण्याची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी आशा स्वंयसेविकांची नियुक्‍ती केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com