आधी शिक्षकांचे क्वारंटाइन मग शाळेचे काम

EDUCATION.jpg
EDUCATION.jpg


सोलापूरः आधी कोरोनाच्या कामात असलेल्या शिक्षकांना त्यांचे काम थांबवून 14 दिवस क्वारंटाइन करावे. ज्या शाळा गावातील क्वारंटाइन कामासाठी वापरल्या त्याचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर तर शाळा सुरू कराव्यात. मे अखेर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असेल तर शाळा वेळेत सुरू कशा करता येतील अशी भूमिका शिक्षक आमदारांनी सरकारसमोर मांडली आहे. 15 जूनला शाळा सुरू करण्याच्या मुद्‌द्‌यावरून या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

शाळा दरवर्षीप्रमाणे 15 जूनला सुरु कराव्यात, अशी भूमिका शासनाकडून समोर आली होती. या मुद्‌द्‌यावर राज्यातील शिक्षक आमदारांनी अनेक प्रकारचे मुद्दे मांडून ही भूमिका खोडून काढण्यास सुरवात केली आहे. 
एकतर कोरोना संकटात अनेक प्रकारच्या शासकीय कामांत शाळांचे शिक्षक गुंतले आहेत. त्यांना उन्हाळी सुटी मिळालेलीच नाही. आधी त्यांना सुटी द्यायला हवी. तसेच कोरोना कामात असतील त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करावे लागणार आहे. अनेक शाळा या कोरोना इन्स्टिट्यूशनल कामासाठी वापरल्या आहेत. या शाळा आधी कोरोना कामातून काढल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करायला हवे. या गोष्टी झाल्यास शाळा सुरू करणे शक्‍य होणार आहे. अनेक पालक विविध गावांत अडकले आहेत. त्यांना गावी पोचता आले नाही तर मुले शाळेत कशी येणार हा प्रश्‍न समजून घेतला पाहिजे. 

त्या शिवाय शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण कामासाठी सेवक देखील नाहीत. तर शाळांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका कसा टाळता येणार आहे. त्यातच महाराष्ट्रात मे अखेरीस कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. जूनमध्ये आणखी वाढण्याची भीती आहेच. 
सध्या फार शाळांना ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करणे शक्‍य होईल. हा वयोगट कोरोना प्रतिबंधात्मक उपाय समजून काम करू शकतो. शाळा उशिरा सुरू होणार आहे तर विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तके द्यावीत ही भूमिका शिक्षक आमदारांकडून समोर आली आहे. 

आधी प्रतीबंधाला द्यावे महत्व 
सध्याच्या शाळा सुरू करण्याच्या अनेक अडचणी शासनासमोर मांडल्या आहेत. शिक्षकांची सुरक्षितता, शाळेची स्वच्छता व मुलांना संसर्गापासून रोखणे हेच प्राधान्यक्रम असले पाहिजेत. 
आमदार  विक्रम काळे, शिक्षक आमदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com