
गाडी क्र. 09120 केवडिया-चैन्नई विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस ता. 20 जानेवारी 2021 रोजी केवडिया स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.
सोलापूर : रेल्वे प्रशासन नागरिकांच्या मागणीनुसार नवीन गाडी क्र. 09119/09120 केवडिया-एमजीआर चैन्नई सेंट्रल-केवडिया सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर गाडीचे उदघाटन 17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गाडी क्र. 09120 केवडिया-चैन्नई विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस ता. 20 जानेवारी 2021 रोजी केवडिया स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी केवडिया स्थानकावरून सकाळी 09.15 वाजता सुटेल आणि वडोदरा, सुरत, कल्याण, पुणे आगमन रात्री 08.20 प्रस्थान 08.30 वाजता, सोलापूर आगमन रात्री 12.40 प्रस्थान 00.45, रायचूर, गुटकंल, कडप्पा, रेनिंगुटा आगमन दुपारी 12.58 प्रस्थान 01.00, पेरंबूर व एमजीआर चैन्नई स्थानकावर दुपारी 04.00 वाजता पोहचेल. 2.गाडी क्र. 09119 चैन्नई- केवडिया- विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस ता. 24 जानेवारी 2021 रोजी चैन्नई स्थानकावरून आठवड्यातील प्रत्येक रविवारी पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.
सदर गाडी एमजीआर चैन्नई स्थानकावरून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि ही गाडी रेनिंगुटा, कडप्पा, गुटकंल, रायचूर, सोलापूर आगमन दुपारी 12.20 प्रस्थान 12.25, पुणे आगमन दुपारी 04.35 प्रस्थान 04.40, कल्याण आगमन रात्री 07.27 प्रस्थान 7.30, वसईरोड, सुरत, वडोदरा आणि केवडिया स्थानकावर पहाटे 03.00 वाजता पोहचेल. तरी सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरिल विशेष गाडीचा लाभ आपल्या प्रवासा दरम्यान घ्यावा व गाडीची वेळ लक्षात ठेऊन आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.