माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, राजकीय गणितापेक्षा शिक्षकांची चळवळ अधिक मोलाची 

dattatray sawant.jpg
dattatray sawant.jpg

सोलापूरः शिक्षकांच्या प्रश्नांची गांभिर्यानं सोडवणूक हे कायमचे प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न आणि चळवळीपेक्षा राजकीय गणिताचा निकाल महत्त्वाचा वाटत नाहीत. आपल्याला प्रथम पसंतीची मतेही मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत वाढली आहेत. आता मरगळ झटकून पुन्हा एकदा शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामाला लागले पाहिजे, अशी अपेक्षा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केली. 

सोनामाता प्रशालेमध्ये शिक्षक मतदारसंघ निवडणुकीबाबत महराष्ट्र राज्य शाळा कृती समितीची विचारमंथन बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, आपण शिक्षकांचे प्रश्न हाती घेऊन सातत्याने काम करत आहोत. आमदार होण्यापूर्वी आपण कार्यकर्ता होतो आणि आता पुढेही कार्यकर्ता असणार आहे. शिक्षकांचे पाठबळ तसूभरही कमी झाले नाही, तर वाढले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये प्रथम पसंतीची मते मिळाली. त्यापेक्षा आता दोन हजार 424 मतांची वाढ झाली आहे. आपल्यासमोर शिक्षकांच्या प्रश्नांचे गांभीर्य एवढे अधिक होते की, त्यासमोर कोणती राजकीय गणिते आपल्याला पाहता आली नाहीत. ते एका अर्थाने बरेच झाले. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. 
तीन पक्षांचे लोक एकत्र येऊन 15 हजार मते घेतात. या निवडणुकीत आपल्याला अकरा हजार मते पडली आहेत. जी मते मिळाली आहे, ती आपली स्नेहाची आणि प्रश्न सोडवण्याच्या बांधिलकीतून मिळाली आहेत. विरोधक निवडणूक जिंकले असले, तरी त्यांना विजयोत्सव शिक्षकांऐवजी राजकीय पध्दतीने लोक गोळा करून करावा लागला आहे. यावेळी कृती समितीचे राज्य संघटक समाधान घाडगे, जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, संपर्क प्रमुख शंकर वाढणे, शहराध्यक्ष सरदार नदाफ, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू देशमुख, संतोष गायकवाड, जिल्हा सचिव विकास शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू मानकर यांनी केले, तर श्री. शिंदे यांनी आभार मानले. 

आमदारकी नव्हे, तर चळवळीशी नातं 

आमदारकीशी नाते मानले नाही तर चळवळीशी नातं मानले हे महत्त्वाचे आहे. कृती समितीच्या कार्यकर्त्यांना पुढील काळात याच पद्धतीने काम करावे लागणार आहे. पुढील काळात आपण काम करणार आहोत. या मतदारसंघात शिक्षकांच्या प्रश्नासाठी कार्य सुरू करणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नाचा अभ्यास करुन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मदतीचे काम चालू ठेवले पाहिजे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अभ्यासाची आणि प्रश्न मांडण्याची संधीदेखील दिली पाहिजे. शेवटी आपण चालवलेल्या चळवळीत काही गमावले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com