मित्रानेच पळवली मित्राची बायको अन्‌ मग...

Friend and friend's wife
Friend and friend's wife

सोलापूर : बायकोला पळवून आणल्याच्या कारणावरून चिडलेल्या मित्राने सोलापुरातील बेकरी व्यावसायिक प्रज्वल ईश्‍वर गौडा (वय 30, रा. अवंतीनगर, जुना पूना नाका) याच्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी लोहित रामा गौडा (रा. एम. होसकोपल्ली, जि. हसन, कर्नाटक) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रज्वलचे लोहितच्या पत्नीला लग्नाचे आश्‍वासन
यातील आरोपी लोहित गौडा हा गेल्या पंधरा वर्षांपासून लोणावळा येथे बेकरी चालवतो. फिर्यादी प्रज्वल गौडा याची लोहित याच्याबरोबर गेल्या सहा वर्षापासून ओळख आहे. प्रज्वल याचा अवंतीनगर येथे बेकरीचा व्यवसाय आहे. प्रज्वल आणि लोहित यांची चांगली मैत्री निर्माण झाली होती. एका वर्षापूर्वी प्रज्वल हा लोहित याला भेटण्यासाठी लोणावळा येथे गेला होता. तिथे गेल्यानंतर लोहित याच्या पत्नीने प्रज्वलशी संवाद साधला. "लोहित हा मला खूप त्रास देत आहे. मला त्याच्यासोबत राहायचे नाही. मला तुमच्यासोबत राहायचे आहे. तुम्ही मला घेऊन चला नाहीतर मी आणि माझी मुलगी आत्महत्या करते...' असे लोहितच्या पत्नीने प्रज्वलला सांगितले. त्या वेळी प्रज्वल हा लोहित याच्या पत्नीस "आपण लग्न करू' असे सांगितले. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे होऊ लागले.

लोहितने केले प्रज्वलवर चाकूने वार
त्यानंतर 26 जानेवारी 2020 रोजी प्रज्वल लोहितच्या पत्नीला व तिच्या मुलीला सोलापूर येथे आणून तिच्यासोबत राहू लागला. याचा राग मनात धरून लोहितने सोलापूर गाठले. त्याने प्रज्वल याला शिवीगाळ आणि दमदाटी करत त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. चाकूच्या हल्ल्यामध्ये प्रज्वल जखमी झाला आहे. प्रज्वलच्या फिर्यादीनुसार लोहित याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी लोहित यास अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला जामीन मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com