बापरे.. गॅस सिलेंडर घेऊन निघालेल्या ट्रकला आग! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांना बाजूला केले आहे. घटनेची माहिती कळताच सोलापूर अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले आहे.

सोलापूर : सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर तामलवाडी टोलनाक्‍या परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्‍या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली.

आगीमध्ये सिलेंडरच्या टाक्‍यांचा स्फोट झाला आहे. मोठी आग लागल्याने पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांना बाजूला केले आहे. घटनेची माहिती कळताच सोलापूर अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले आहे.

अग्निशमन दलाचे पथक पोचले तेव्हा गॅस सिलेंडर टाकीचे स्फोट होत होते. गॅस सिलेंडर टाक्‍या घेऊन सोलापूरहून लातूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकला आग लागली होती. ही आग वाढत जाऊन मागे असलेल्या सिलेंडर टाक्‍यांना आगली. यात सिलेंडर टाक्‍याचा स्फोट झाला आहे, असे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder track fire