नागरिकांना स्वच्छ पाणी द्या
शहरातील बहुतांश भागाला रुपाभवानी मंदिर परिसरातील पाणी गिरणीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्याठिकाणी अस्वच्छता झाली असून अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी तातडीने रविवारी रात्री त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी कुत्रे मृत पावलेले दिसून आले तर काही ठिकाणी मद्यपान करुन टाकलेल्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या नोंदवहीत मागील काही दिवसांत एकही वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी फिरकला नसल्याचेही समोर आले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने आयुक्तांना निवेदन देऊन अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करुन स्वच्छता ठेवण्याची मागणी केली. तर मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या रुपाभवानी मंदिरासमोरील पंपहाऊसची दुरावस्था झाली आहे. मृत जनावरे पाण्याच्या टाकीजवळ पडूनही त्याठिकाणी स्वच्छता केली जात नाही. मद्यपान करुन मद्यपींनी त्याठिकाणीच बाटल्या टाकल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी रविवारी (ता. 21) रात्री पंपहाऊसची पाहणी केली.
नागरिकांना स्वच्छ पाणी द्या
शहरातील बहुतांश भागाला रुपाभवानी मंदिर परिसरातील पाणी गिरणीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्याठिकाणी अस्वच्छता झाली असून अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी तातडीने रविवारी रात्री त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी कुत्रे मृत पावलेले दिसून आले तर काही ठिकाणी मद्यपान करुन टाकलेल्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या नोंदवहीत मागील काही दिवसांत एकही वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी फिरकला नसल्याचेही समोर आले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने आयुक्तांना निवेदन देऊन अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करुन स्वच्छता ठेवण्याची मागणी केली. तर मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नागरिकांना चार- पाच दिवसाआड पाणी मिळते. चार दिवसांपूर्वी सोडलेल्या पाण्याचा साठा करुन नागरिक तेच पाणी पितात. मात्र, काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी तर कधी सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळ्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता पाणी गिरणी परिसराच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. पाण्यात टाकण्यासाठी तुरटीदेखील त्याठिकाणी नाही. नागरिकांच्या जिवनाशी थेट संबंध असल्याने अधिकाऱ्यांनी पंपहाऊसला सातत्याने भेटी देऊन पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत.
तरीही रुपाभवानी पाणी गिरणीस मागील सव्वा महिन्यापासून एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट दिल्याची नोंद दिसली नाही. नगरसेविका फुलारे यांनी रविवारी त्याठिकाणच्या नागरिकांच्या तक्रारीवरुन पाहणी केली. त्यावेळी ऑपरेटर वगळता अन्य कोणीही त्याठिकाणी नसल्याचे समोर आले. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना करुन अशा ठिकाणांची व्यवस्था करावी, त्याठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करावा, अशी मागणी केली आहे.
अन्यथा आगामी काळात जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांना दिला. आता आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.