गुगलही सांगतंय आता घरी रहा, जीव वाचवा 

सुस्मिता वडतिले
रविवार, 5 एप्रिल 2020

नेटवर्किंगमधील सर्वांत मोठं सर्च इंजिन म्हणून ओळख असलेले गुगल सर्वांना माहिती आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर लगेच आपण गुगलकडे जातो. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर गुगलजवळ मिळते. तेच गुगल आता "घरी रहा, जीव वाचवा, कोरोना व्हायरस थांबविण्यास मदत करा', असे आवाहन करत आहे.

सोलापूर : नेहमीच सोशल मीडियाद्वारे आपल्याला बसल्याजागी नवनवीन माहिती मिळत असते. तसेच सध्या चर्चेतला विषय म्हणजे कोरोना, कोरोना आणि कोरोनाच. कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गुगलही सर्वांना "घरी रहा, जीव वाचवा, कोरोना व्हायरस थांबविण्यास मदत करा', असे आवाहन करत आहे. 
नेटवर्किंगमधील सर्वांत मोठं सर्च इंजिन म्हणून ओळख असलेले गुगल सर्वांना माहिती आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर लगेच आपण गुगलकडे जातो. प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर गुगलजवळ मिळते. तेच गुगल आता "घरी रहा, जीव वाचवा, कोरोना व्हायरस थांबविण्यास मदत करा', असे आवाहन करत आहे. संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत सर्वत्र पसरली गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक उपाययोजना सुरू आहेत. संचारबंदी करण्यात आली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्वांना सुरक्षित राहण्यासाठी घराच्या बाहेर निघू नका, असे आवाहन केले आहे. त्याच पद्धतीने आज गुगलही मागे न राहता गुगलही सर्वांना आवाहन करतो आहे की, "घरी रहा, जीव वाचवा, कोरोना व्हायरस थांबविण्यास मदत करा' असे सांगितले आहे. म्हणजे आपल्याजवळ असलेले स्मार्टफोन, संगणक आणि लॅपटॉपवरील गुगलवर गेल्यानंतर गुगल या शब्दकोशावर क्‍लिक केल्यास "स्टे होम, सेव्ह लिव्हज : हेल्प स्टॉप कोरोना व्हायरस' असा मेसेज व्हायरल होत आहे. त्यात गुगल मराठीत असेल तर मराठीत मेसेज अपडेट होत आहेत आणि इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये मेसेज अपडेट होत आहेत. 

"स्टे होम, सेव्ह लिव्हज : हेल्प स्टॉप कोरोनाव्हायरस' यात 
- घरी रहा 
- सुरक्षित अंतर ठेवा 
- हात वारंवार धुवा 
- आपला खोकला झाकून ठेवा 
- आजारी असल्यास हेल्पलाइनला कळवा 
असा मेसेज दिला जात आहे. 

गुगलद्वारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी कशी सुरक्षा घेतली पाहिजे. 
- नेहमी 20 मिनिटे हात स्वच्छ केले पाहिजे. 
- मास्कचा वापर करावा. 
- प्रत्येक व्यक्तीपासून एक फुटाचे अंतर ठेवा. 
- घरीच रहा कोरोना व्हायरस थांबविण्यास मदत करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google also says stay home now, save lives