मोठी बातमी! हातावर पोट असलेल्या दिड कोटी लाभार्थ्यांसाठी सरकार काढणार कर्ज; 'यांना' मिळणार प्रत्येकी पाच हजार रुपये

तात्या लांडगे
Sunday, 17 May 2020

लॉकडाउनमुळे हातावरील पोट उपाशीच
कोरोना या विषाणूचा सामना करत असताना राज्य 22 मार्चपासून लॉकडाउन आहे. आता 56 दिवस झाले राज्यातील लघू व्यावसायिकांसह हातावरील पोट असलेल्या व्यक्तींना काम मिळालेले नाही. त्यांना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय विचाराधिन असून त्यासाठी सरकार कर्ज काढेल. हातावर पोट असलेले न्हावी, चांभार, कुंभार, रिक्षावाले, बांधकामासाह व अन्य क्षेत्रातील कामगारांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी माझ्यासह बहूतांश मंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

सोलापूर : हातावरील पोट असलेल्या राज्यातील दीड कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची मागणी माझ्यासह बहूतांश मंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी सुमारे सात हजार 500 कोटी रुपये लागणार आहेत. राज्याची सद्यस्थिती पाहता एवढे पैसे उपलब्ध नसल्याने हातावरील पोट असलेल्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कर्ज काढेल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.
कोरोनाच्या संकटामुळे 22 मार्चपासून राज्य लॉकडाऊन आहे. हातावर पोट असलेल्या चांभार, कुंभार, न्हावी अशा लघू व्यावसायिकांसह रिक्षावाले, बांधकाम मजूर, विडी कामगारांची चिंता वाढली आहे. अडचणीतील या दीड कोटी लोकांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अशा लोकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची मागणी मंत्रिमंडळातील बहूतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधितांना दिल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, मागील सरकारने राज्याच्या डोक्यावर चार लाख 75 हजार कोटींहून अधिक कर्जाचा डोंगर करुन ठेवल्याने राज्य सरकारकडे तेवढा पैसा सध्या उपलब्ध नाही. तत्यामुळे कर्ज काढून अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी यथे क्लिक करा
लॉकडाउनमुळे हातावरील पोट उपाशीच

कोरोना या विषाणूचा सामना करत असताना राज्य 22 मार्चपासून लॉकडाउन आहे. आता 56 दिवस झाले राज्यातील लघू व्यावसायिकांसह हातावरील पोट असलेल्या व्यक्तींना काम मिळालेले नाही. त्यांना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील दीड कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय विचाराधिन असून त्यासाठी सरकार कर्ज काढेल. हातावर पोट असलेले न्हावी, चांभार, कुंभार, रिक्षावाले, बांधकामासाह व अन्य क्षेत्रातील कामगारांना तत्काळ मदत व्हावी, यासाठी माझ्यासह बहूतांश मंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच सरकार त्यांना मदत करेल.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government of Maharashtra will provide loans to the beneficiaries