देखणे ग्रीन झोन पशुपक्ष्यांनी होताहेत समृध्द

birds.jpg
birds.jpg

सोलापूर: शहरातील कंबर (संभाजी तलाव) तलाव, सिद्धेश्‍वर तलाव, स्मृतिवन आणि वनविहार परिसरात पक्ष्यांचा विहार व फुलांनी लगडलेला गुलमोहर या सारख्या हिरवाईने नटलेल्या परिसरात शहरातील जैवविविधता समृद्ध झाली आहे. हे ग्रीन झोन सोलापूरसाठी आता टुरीस्ट पॉईंट बनू लागले आहेत. 

शहरातील काही भाग अजूनही मानवी वस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे ही ठिकाणे पशुपक्ष्यांची मोठी वसतिस्थाने बनली आहेत. कंबर तलाव व सिद्धेश्‍वर तलाव जलस्त्रोतावर आधारित जैवविविधता जपणारी क्षेत्रे आहेत. या दोन्ही तलावांच्या परिसरात अनेक जलपक्षी व शैवालाचे अनेक प्रकार आढळून येतात. यामध्ये अनेक पाणवनस्पती देखील आहेत. याशिवाय अनेक पाणकोंबड्या, चित्रबलाक, बगळे हे पक्षी देखील मुक्तपणे विहार करतात. 

या कंबर तलावाच्या पलीकडील बाजूने स्मृतिवनाचा 52 एकरांच्या परिसरात करंज, शिसव, आंबा, आवळा, बहावा, जांभूळ, बकुळ, करवंद, पिंपळ, वड, ब्रह्मदंड, गुलमोहर आदी अनेक प्रकारची झाडे विकसित झाली आहेत. बुलबुल, दयाळ, करकोचा, गांधारी खाटीक, जांभळी, राखी वटवट्या, स्वर्गीय नर्तक, रातवा, हुदहूद, शेकाट्या, मोर, पिवळा धोबी, वारकरी, धनेश अशा अनेक पक्ष्यांची मोठी वस्ती आहे. यासोबत वन विभागाचे विजयपूर रोडवर असलेले 500 एकरांचे वनक्षेत्र याचप्रमाणे वनस्पती व पक्ष्यांच्या उपस्थितीने बहरले आहे. या वनक्षेत्रात ससे, मुंगूस, तरस आदी अनेक जंगली प्राणी मुक्तपणे फिरत असतात. 
आता सोलापुरातील ग्रीन झोन पर्यटकासाठी देखील आकर्षणाचे केंद्र बनू लागली आहेत. योग्य पध्दतीने या ग्रीन झोनचा विकास केला तर पुढील काळात तलाव व जंगले पर्यटकांना आकर्षीत केल्या शिवाय राहणार नाही असे म्हणण्यास हरकत नाही. 
सोलापूरच्या वाढत्या लोकसंख्येसाठी सध्या ही जैवविविधतेची क्षेत्रे अत्यंत उपयोगी ठरली आहेत. देखण्या दगडी इमारती, भव्य रस्ते यामुळे स्मार्ट सिटी ही ओळख शहराला बनली आहे. या सोबत झाडांच्या गर्दीत असलेल्या इमारतींनी शहराची हिरवाई अधिक समृध्द केली आहे. यामध्ये आता शहरातील वसाहतीमध्ये घराभोवतीची हिरवाई व मोकळ्या जागामध्ये झाडे यांची सुयोग्य भर पडली तर स्मार्ट इको-फ्रेंडली सिटी असाही नावलौकिक होऊ शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com