corona.jpg
corona.jpg

मंगळवेढा तालुक्‍यात 47 हजार कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण सुरू 

मंगळवेढा (सोलापूर) ः कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहर व ग्रामीण भागातील 47 हजार 575 कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे या सर्वेक्षणातून बाधित रुग्णांची संख्या समोर येण्यास मदत होणार आहे. 

कोविडच्या नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी आज पासून 15 ऑक्‍टोबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल पंचायत समिती व आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना अशा परिस्थितीत सध्या ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निकराची लढाई सुरू केली. यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक अंगणवाडी सेविकांच्या समवेत मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षकासह ग्रामस्तरीय समिती पथकांची नियुक्ती करण्यात आली. असून दहा पथकामध्ये एक डॉक्‍टर नियुक्त समाविष्ट करून त्यांच्याद्वारे उपचार व संबंधित सेवा दिली जाणार आहे. 

ही मोहीम दोन फेऱ्यांमध्ये राबवले जाणार असून पहिली तरी 15 दिवसाची तर दुसरी फेरी दहा दिवसांची असणार आहे. ही पथके दररोज पन्नास कुटुंबाला भेट देऊन त्या कुटुंबातील सदस्य तापमान, ताप, खोकला, दम लागणे, ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करतील. त्यांना आवश्‍यकतेनुसार या सेंटरवर उपचारासाठी दाखल करण्यात येईल. शिवाय यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार इत्यादी आजारासाठी प्रमाणे लागणारे आवश्‍यक ते औषध प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय स्तरावर उपलब्ध करण्यात येणार आहेत. 
यामध्ये मंगळवेढा नगरपालिका हद्द व ग्रामीण भागात यांच्या स्वतंत्ररीत्या पथकाद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यात एकूण 176 पथके नियुक्त केली. त्यात ग्रामीण भागात 166 तर नगरपालिका हद्दीत 10 अशा 176 पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात या गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. 
ग्रामीण भागात 152 तर शहरात 45 ऑक्‍सिमीटर, ग्रामीण मध्ये 122 तर 45 शहरांमध्ये 45 थर्मामीटरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य केंद्र व लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे. आंधळगाव 8 हजार 724, बोराळे 8 हजार 151, सलगर बुद्रूक 4143, मरवडे 4526, भोसे 4672 तर शहरातील 4609 लोकसंख्येची तपासणी होईल. 


लवकर निदान व लवकर उपचार महत्वाचे 
कोरोना आजारांमुळे होणारे मृत्यू टाळावयाचे असतील तर लवकर निदान व लवकर उपचार या तत्त्वावर काम करावे लागेल. यासाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहकार्य करावे व तपासणी करून जो सल्ला दिला जाईल त्याचे तंतोतंत पालन करावे. 
डॉ.नंदकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी 

नागरिकांनी मोहिमेला सहकार्य करावे 

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शहर व ग्रामीण भागात सूक्ष्म नियोजन ग्राम समिती व वार्ड समितीच्या माध्यमातून केले जात आहे. नियुक्त पथकाद्वारे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य नोंद घेऊन त्याची तपासणी करून वृद्ध, बाधित व्यक्तींना वेळीच उपचार करून त्याचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. यासाठी ग्रामीण व शहरी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करावे. 
- उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com