आपले ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करायचंय? आता "आरटीओ'ला जाण्याची नाही गरज; असे करा रिन्यू 

श्रीनिवास दुध्याल 
Monday, 25 January 2021

आरटीओकडे हजारो वाहनचालकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे आधीच लायसन काढलेले मात्र त्याची व्हॅलिडिटी संपलेल्या वाहनधारकांना आपले लायसन रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ ऑफिसला न जाता ऑनलाइनही लायसन रिन्यू करता येऊ शकते. 

सोलापूर : टू-व्हीलर, फोर-व्हीलर गाड्या चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन आवश्‍यक आहे. त्याशिवाय तुम्ही वाहन चालवल्यास आपल्याला मोठा दंड व प्रसंगी शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकजण मोठ्या दिव्यातून आरटीओ ऑफिसमध्ये हेलपाटे मारून, प्रसंगी एजंटांना अव्वाच्या सव्वा रुपये मोजून सुरवातीला लर्निंग लायसन व नंतर परमनंट लायसन मिळवतो. मात्र लायसनची व्हॅलिडिटी संपल्यावर मात्र ते रिन्यू करून घेण्यासाठी पुन्हा आरटीओ ऑफिसच्या चकरा व एजंटांमार्फत पैसे खर्च करून आपले लायसन रिन्यू करावे लागते. 

सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरटीओ ऑफिसला जाऊन गर्दीत लायसन रिन्यू करणे जिकिरीचे ठरते. अनेक ठिकाणची आरटीओ ऑफिसेस कोरोनामुळे लायसन वितरीत करणे बंद केले होते. आता कुठे लायसनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, आरटीओकडे हजारो वाहनचालकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे आधीच लायसन काढलेले मात्र त्याची व्हॅलिडिटी संपलेल्या वाहनधारकांना आपले लायसन रिन्यू करण्यासाठी आता आरटीओ ऑफिसला न जाता ऑनलाइनही लायसन रिन्यू करता येऊ शकते. 

सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म डाउनलोड करून भरावा लागेल. त्यानंतर मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्‍टरांनी भरलेला फॉर्म 1ए अत्यावश्‍यक आहे. 

या कागदपत्रांसह जुने ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोही अपलोड करावा लागणार आहे. यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच पूर्ण करता येणार आहेत. 

काही सोप्या स्टेप्सचा वापर करून अगदी कुठेही न जाता तुम्हाला घरात बसून ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करता येऊ शकेल. 

असे करा आपले लायसन रिन्यू... 

  • ऑनलाइन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू (नूतनीकरण) करण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर parivahan.gov.in/parivahan जा. 
  • तिथे गेल्यावर डावीकडून "अबाउट अस'च्या शेजारील "ऑनलाइन सर्व्हिसेस' पर्यायावर क्‍लिक करा. 

No photo description available.

  • त्याखाली येणाऱ्या "ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिसेस'ला क्‍लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्यासमोर ओपन झालेल्या पेजखाली मध्यभागी "सिलेक्‍ट स्टेट नेम'वर क्‍लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्यासमोर ओपन झालेल्या पेजवर "लर्नर लायसन', "ड्रायव्हिंग लायसन', "कंडक्‍टर लायसन' आदी पर्याय येतील. 
  • त्यातील "ड्रायव्हिंग लायसन'वर क्‍लिक केल्यानंतर "सर्व्हिसेस ऑन डीएल (रिन्यूअल/ डुप्लिकेट/ एईडीएल/ ऑदर्स) या पर्यायावर क्‍लिक करा. 
  • त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर अर्ज व लागणाऱ्या डॉक्‍युमेंट्‌स आदींबाबत माहिती येते. 
  • त्याखालील "कंटिन्यू' ऑप्शनला क्‍लिक करा. 
  • त्यानंतर समोर आलेल्या पेजवरील आपल्या लायसनवरील सर्व माहिती विचारलेल्या कॉलममध्ये भरा व पुढील प्रोसिजर पूर्ण करा. 
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत आपले ड्रायव्हिंग लायनस आपण नोंदवलेल्या पत्त्यावर येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Here are some important tips to renew your driving license online