भाजपचे खासदार डॉ. महास्वामी यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

A 3.jpg
A 3.jpg

सोलापूर : जातीचा खोटा दाखला सादर करून निवडणूक लढवल्याप्रकरणात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून गुरुवारी (ता. २६) अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती ॲड. संतोष न्हावकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत बनावट दाखला सादर केल्याप्रकरणात खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावर सदर बाझार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी खासदारांविरोधात फिर्याद दिली होती. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यासह अक्कलकोट व उमरगा तहसील कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. त्यानंतर जातपडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती जमातीसाठी असलेले लाभ घेतल्याच्या कारणावरुन अक्कलकोट आणि उमरगा तहसीलदारांना न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com