बार्शीत चिनी सैनिकाच्या हल्ल्याचा निषेध करत केली चिनी वस्तुंची होळी 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 18 जून 2020

बार्शी नगरपालिकेसमोर गुरुवारी साडेबाराच्या दरम्यान चिनी मोबाईल, खेळणे यासह विविध वस्तू आणून त्यांची होळी केली. याप्रसंगी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, विश्वास बारबोले, विजय राऊत, दिपक राऊत, भारत पवार, प्रशांत कथले, नवनाथ चांदणे उपस्थित होते.

बार्शी(सोलापूर)ः भारत आणि चीन देशामध्ये सीमारेषेवर तणाव निर्माण झाला असून पूर्व लडाख मधील गलवान खोऱ्यात निशस्त्र भारतीय जवानांवर चिनी सैनिकाकडून झालेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. चिनी सैनिकाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ चिनी वस्तूंची नगरपालिकेसमोर अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी होळी करुन जवानांना श्रद्धांजली वाहिली. भारत माता की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला. 

हेही वाचाः पेट्रोल दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचे सोलापुरात आंदोलन 

बार्शी नगरपालिकेसमोर गुरुवारी साडेबाराच्या दरम्यान चिनी मोबाईल, खेळणे यासह विविध वस्तू आणून त्यांची होळी केली. याप्रसंगी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, विश्वास बारबोले, विजय राऊत, दिपक राऊत, भारत पवार, प्रशांत कथले, नवनाथ चांदणे उपस्थित होते. भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तु मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. या व्यापारातून करोडों रुपयांचा महसूल चीनला मिळत आहे. चीनची आर्थिक व्यवस्था कोलमडण्यासाठी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. चीनने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यांना सडेतोड उत्तर भारत देईलच. नागरिकांनी यापुढे स्वदेशी वस्तूंचा वापर करुन भारताची अर्थव्यवस्था बळकट करावी असे आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Holi of Chinese goods protesting the attack of Chinese soldiers in Barshi