रुग्णांना दवाखान्यात पोहचवून प्राण वाचवणाऱ्या जीवरक्षकांचा सत्कार 

covid satkar.jpg
covid satkar.jpg

सोलापूरः येथील बापूजी नगर येथे कोरोना काळात रुग्णांना तत्काळ दवाखान्यात नेऊन त्यांचे प्राण वाचवणारे जीवरक्षक व कोविड योध्दयांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेवक माशप्पा विटे, नगरसेविका कामीनी आडम, नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

अध्यक्षीय भाषणात प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका कामीनी आडम यांनी कोविड योद्धा आणि जीवरक्षकांचे विशेष आभार मानले. सर्वांना विजय दशमी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रे नगर फेडरेशन च्या चेअरमन नलिनी कलबुर्गी यांच्या हस्ते कोविड योद्धा व जीवरक्षकांचा रोख 2 हजार रुपये, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 
जीवरक्षक डेव्हिड शेट्टी, सुरेश भंडारे, विशाल म्हेत्रे, श्रीनिवास चन्नापागोलू, परशुराम कुमार, नरसिंह म्हेत्रे, एलयजर सातालोलु, आनंद मेंसिलोळू, औदुंबर खटके, नरेश दुगाणे, सचिन सरवदे यांचा सत्कार झाला. तसेच कोविड योध्दा यल्लप्पा भंडारे, मोहन कोक्कुल, नरसिंह बुद्धिमत्ती, व्यकंटेश म्हेत्रे, अनिल भंडारे, विशाल बुगले, नरेश गड्डम, वहिद शेख, सलीम बागवान, जिजा भंडारे, सागर म्हेत्रे, यतीराज सातालोलु, मारुती मेंसिलोलू, अक्षय कोळेकर, राजू आंबेवाले, दिनेश परदेशी यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक निकंबे, मोहन कोक्कुल, किशोर गुंडला लक्ष्मीनारायण जोरीगल,दाऊद शेख आदींनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक रे नगर फेडरेशन चे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले. 

त्या काळरात्रीच्या आठवणी 
यावेळी माजी आमदार श्री.आडम यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊन टप्पे वाढू लागले. लोक अन्न पाणी आरोग्य आणि रोजगारांसाठी तडफडत होती. दररोज रात्री कोरोना अपडेट येत असत ते ऐकून माझ्या मनाची घालमेल होत असे. त्या दिवशी सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मनावर प्रचंड ताण पडला. काही क्षण स्तब्ध झालो आणि माझे रक्तदाब व साखरेची पातळी अचानक वाढून मला भुरळ आली. मनाचा ताबा सुटला, शरीराचा तोल गेला तेव्हा सजगता आणि सतर्कता दाखवून अवघ्या 10 मिनिटाच्या आत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मला जाग आल्यावर वाटलं की काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असे सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com