दर कोसळल्याने लिंबू वेचणीची मजूरी द्यायची तरी कशी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या खरबूज, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब आदी फळांना बाजारपेठा सुरू नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष वगळता इतर फळांची काढणी सोडून दिली. तीच अवस्था आता लिंबूची झाली आहे. मागणी नसल्याने बाजारात 20 किलोचा डाग सुमारे 150 रुपयांस विकला जात आहे.

मोहोळ(सोलापूर)ः कोरोना संसर्ग व शीतपेयावरील बंदीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामूळे लिंबांना पुरेसी मागणी नाही. यामुळे उत्पादकांची आर्थिक अडचण झाली आहे. 

हेही वाचाः सोलापूर जनता बॅंकेने आणली जनाधार, सोने तारण योजना 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या खरबूज, कलिंगड, द्राक्ष, डाळिंब आदी फळांना बाजारपेठा सुरू नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष वगळता इतर फळांची काढणी सोडून दिली. तीच अवस्था आता लिंबूची झाली आहे. मागणी नसल्याने बाजारात 20 किलोचा डाग सुमारे 150 रुपयांस विकला जात आहे. प्रत्येक डागास 50 रुपये वाहतूक द्यावी लागते. शिवाय बाजारपेठेचा इतर खर्च वेगळा. प्रत्येक उन्हाळ्यात लोणचे व लिंबू सरबतासाठी लिंबूला मोठी मागणी असते. मात्र, चालू वर्षी लॉकडाउनमुळे सर्वच गणित बदलले आहे. 

हेही वाचाः कोरोना संकटात गरजूंना त्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा आधार 

सध्या लिंबोणीच्या झाडाला भरपूर फळाचा बहर आला आहे. बाजारात विक्रीसाठी पाठवावी म्हटले तरी परवडत नाही. दराचा हिशेब केला तर वेचणीचा रोजगारही पदरमोड करून द्यावा लागतो. लिंबाचे लोणचे वगळता अन्य उपपदार्थ जास्त दिवस सुस्थितीत राहत नाहीत. झाडाखालची लिंबू वेचली नाहीत तर ती खाली पडून तडकतात. त्यावर डास व इतर हानिकारक किडीचा प्रादुर्भाव होऊन झाडावरील चांगल्या लिंबाच्या फळाचे ते नुकसान करतात. त्यामुळे पदरमोड करून का होईना ती वेचावीच लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. 

बाग काढण्याशिवाय पर्याय नाही 
माझी 20 एकर लिंबू बाग आहे. एक दिवसाआड 100 डाग निघतात. लिंबू वेचून विक्रीला पाठविणे परवडत नाही, त्यामुळे काही प्रमाणात बाग काढावी या विचारात आहे. 
- मयूर कुलकर्णी,शेतकरी, पापरी, ता. मोहोळ  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to pay for selling lemons due to falling prices?