सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळेल असे वाटत होते; कोण म्हणाले वाचा 

अण्णा काळे 
Thursday, 3 September 2020

राजेंद्रसिंह राजेभोसले म्हणाले, की जिल्हा दूध संघासाठी अडचणीचा काळ आहे. आज जरी मला अध्यक्षपदाची संधी मिळाली नसली तरी भविष्य काळात माझ्या 35 वर्ष संचालकपदाच्या काळाचा विचार करता संधी मिळू शकते. मी सुरवातीची अनेक वर्ष मोहिते-पाटील गटाचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. नंतर स्व. दिगंबरराव बागल यांच्या बरोबर काम केले. त्यानंतर मी आमदार संजय शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. मी लोकसभा निवडणुकीतही संजय शिंदे यांचा प्रचार केला आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही मी संजय शिंदे यांच्याबरोबर होतो. 

करमाळा (सोलापूर) : मला दूध संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळेल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र दूध संघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही. सध्या दूध संघ अडचणीत असून पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे, असे मत जिल्हा दूध संघाचे जेष्ठ संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राजेंद्रसिंह राजेभोसले यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. त्यामुळे राजेंद्रसिंह राजेभोसले हे नाराज असल्याच्या चर्चेवर त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. श्री. राजेभोसले म्हणाले, सध्या दूध संघाचे संकलन कमी झाले आहे. दूध संघ अडचणीत असल्याने यासाठी तात्काळ संघाला मोठ्या अर्थिक मदतीची गरज आहे. दिलीप माने हे देखील माझे मित्रच आहेत. ते दूध संघाची स्थिती सुधारण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करतील. मी पहिल्यांदा 1992 ला दूध संघाचा संचालक झालो. 1992 पासून आजपर्यंत मी संचालक राहिलो आहे. 1999 ते 2003 या कालावधीत उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. आजही जेष्ठ संचालक म्हणून माझ्याविषयी सर्व संचालकांना आदर आहे. करमाळा तालुक्‍यात जिल्हा दूध संघाचे 7 हजार 500 लिटर संकलन असून त्यातील पाच हजार लिटर दूध संकलन माझ्या वीट गावातून मी देतो. कोणत्याही परिस्थितीत दूध संघ टिकावा हीच भुमिका माझी आहे. 

राजेंद्रसिंह राजेभोसले म्हणाले, की जिल्हा दूध संघासाठी अडचणीचा काळ आहे. आज जरी मला अध्यक्षपदाची संधी मिळाली नसली तरी भविष्य काळात माझ्या 35 वर्ष संचालकपदाच्या काळाचा विचार करता संधी मिळू शकते. मी सुरवातीची अनेक वर्ष मोहिते-पाटील गटाचा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. नंतर स्व. दिगंबरराव बागल यांच्या बरोबर काम केले. त्यानंतर मी आमदार संजय शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. मी लोकसभा निवडणुकीतही संजय शिंदे यांचा प्रचार केला आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही मी संजय शिंदे यांच्याबरोबर होतो. 

संपादन : वैभव गाढवे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I thought I would get a chance to be the president of Solapur District Milk Association read who said that