अवैध धंदे तत्काळ बंद करावेत अन्यथा सर्वपक्षीय पदाधिकारी जनआंदोलन

Illegal trades should be stopped immediately in Mangalvedha taluka, otherwise all party office bearers will agitate.jpg
Illegal trades should be stopped immediately in Mangalvedha taluka, otherwise all party office bearers will agitate.jpg

मंगळवेढा (सोलापूर) : शहरासह तालुक्यात वर्षभरापासून खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. मटका, जुगार, दारू विक्री यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे अशा अवैध व्यवसायिंका विरोधात सर्वपक्षीय एकवटले असून हे धंदे बंद करावेत म्हणून निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन मंगळवेढा पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे साहेब यांना देण्यात आले.

तत्कालीन पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळोवेळी लगाम घालून मटका, जुगार, दारू, वाळू तस्करी असे अवैध धंदे बंद केले. परंतु शहरासह ग्रामीण भागातही एजंटाची संख्या वाढत आहे. मटका खेळणा-यात अनेक गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्ती असल्याने पैसा मिळवण्याच्या हेतूने ते चो-यासारखे गुन्हेही करत आहे. वाळू आणि चोरीचे प्रमाण वाढले आहे.

यामध्ये एसटी बस स्थानक देखील सुटले नाही. ग्रामीण भागातून परगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना देखील या चोरट्यापासून सावध राहण्याची वेळ आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी देखील भयभीत झाली आहे. विशेषत: नदीकाठच्या भागात देखील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात एजंट आजही खुले आम मटका, जुगार धंदा करीत असून बिनबोभाट मटका, जुगार, दारु विक्री, राजेरोसपणे सुरु आहे. पोलिसांनी धडक कार्यवाही करुन अवैध धंदे सुरु असणा-याच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

त्यामुळे मटका, जुगार, दारू विक्री, वाळू तस्करी असे अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावेत, अन्यथा सर्वपक्षीय पक्षाच्यावतीने जनआंदोलन करण्याचा इशारा निवेदनात नमुद केले. सदर निवेदनाच्या प्रती मा.पोलिस अधीक्षक सो.(सोलापूर ग्रामीण), मा.पोलिस महानिरीक्षक सो.(कोल्हापूर परिक्षेञ, कोल्हापुर), मा.अनिल देशमुख सो.(गृहमंत्री महाराष्ट्र राज्य), मा.शंभूराजे देसाई सो.(गृहराज्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावरती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत बेदरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अॕड.राहुल घुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मारूती वाकडे, भाजपाचे शहराध्यक्ष गोपाळ भगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुझम्मिल काझी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजाराम सुर्यवंशी, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव आदींच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com