आईचे जावयासोबत तर मुलीचे दिरासोबत अनैतिक संबंध ! आईचा खून करणाऱ्या मुलीसह प्रियकर न्यायालयीन कोठडीत

1husband_wife_0.jpg
1husband_wife_0.jpg

सोलापूर : पती- पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा, असा लक्ष्मीबाई माने यांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र, पाच वर्षांपूर्वी पतीचा आकस्मित मृत्यू झाला. त्यानंतर एका मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीचा कर्नाटकातील तोरवी येथे विवाह झाला. तिच्यासोबत राहायला भाऊही गेला. एकट्या राहणाऱ्या लक्ष्मीबाईचे अनैतिक संबंध जावयासोबतच जुळले. त्याची माहिती मुलीला मिळाली आणि मुलीने तिच्या दिरासोबतच अनैतिक संबंध ठेवले. मात्र, आईने त्यास विरोध केल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईलाच संपविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

घटनाक्रम... 

  • पतीच्या निधनानंतर एकटी राहणाऱ्या सासूचे जुळले जावयासोबत अनैतिक संबंध
  • आईने जावयासोबत अनैतिक संबंध ठेवल्याने मुलीने ठेवले दिरासोबत संबंध
  • दिरासोबतच्या अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या आईला मुलीसह मुलीच्या प्रियकराने संपविले
  • तोरवी (विजयपूर, कर्नाटक) येथे राहायला होती मुलगी; रात्रीत खून करुन दोघेही झाले पसार
  • मयताची नणंद कविता भोसले यांनी 8 नोव्हेंबरला दिली होती विजापूर नाका पोलिसांत फिर्याद
  • लक्ष्मीबाई माने यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुरु केला तपास
  • सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी दोन दिवसांत लावला प्रकरणाचा छडा
  • संशयित आरोपी मुलगी अनिता महादेव जाधव व दिर शिवानंद भिमप्पा जाधव हे दोघेही आता न्यायालयीन कोठडीत
  • अनैतिक संबंधातूनच मुलीने आईचा खून केल्याचे तपासात उघड; कोल्हाळ यांची माहिती

सोलापुरातील कुमठे पसिरातील महालक्ष्मी नगरात राहणाऱ्या लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याची खबर त्यांच्या नणंद कविता भोसले यांना समजली. त्यांनी नणंदेच्या घरी धाव घेऊन पाहिले, तर लक्ष्मीबाई निपचित पडल्या होत्या. खूनाचा संशय आल्याने त्यांनी विजापूर नाका पोलिसांना खबर दिली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चौहूबाजूंनी कानोसा घेतला, मात्र हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा त्यांना संशय आला. त्यांनी शेजारील व्यक्‍तींकडून माहिती घेतल्यानंतर लक्ष्मीबाईंच्या मृत्यूच्या आदल्यादिवशी त्यांची मुलगी व दिर घरी आल्याचे समोर आले. त्यानंतर शितलकुमार कोल्हाळ यांचे पथक तोरवी येथे पोहचले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. त्यानंतर सोमवारी (ता. 16) त्या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्याचे श्री. कोल्हाळ यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com