सोलापुरातील लघुउद्योगांना परवाना शुल्कवाढीचा "शॉक' 

सोलापुरातील लघुउद्योगांना परवाना शुल्कवाढीचा "शॉक' 

सोलापूर :  महापालिका क्षेत्रातील 155 लघुउद्योगांना परवाना शुल्कवाढीचा "शॉक' लागणार आहे. ही वाढ 2017-18पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना तीन वर्षांचे शुल्क भरावे लागेल. 

सध्या 160 रुपये व नवे शुल्क 210 रुपये झालेल्यांमध्ये इलेक्‍ट्रिक पॉवरवरील पिठाची गिरणी, पिठाची गिरणी पल्वलायझर, पॉवरवर हळद, मिरची कांडप, तांदूळ साफ करणे, करडी फोडणे, डांबर साठा, पत्रावळी साठा, वेस्ट कॉटन साठा, जळाऊ लाकूड साठा, पॉवरवर धोटे तयार करणे, लाकडी खेळणी तयार करणे, बॉबीन तयार करणे, बदामी कोळसा तयार करणे, पॉवरवर चुना घाणी, मडकी भाजणे भट्टी, राख साठा, खडू तयार करणे, कोल-कोक तयार करणे, चिंचोक्‍यापासून कोळसा तयार करणे, कमावलेल्या कातडीचा साठा, कच्च्या कातडीचा साठा, कातडी कमावणे, साबण तयार करणे, हाडांचा साठा, तपकीर तयार करणे, पेपर कटिंग व रुलिंग करणे, पॉवरवर पेंटिंग करणे, वर्क्‍स शॉप, लेथ मशिन, वेल्डिंग व गॅसवर वेल्डिंग, बॉलबेसरिंग करणे, इलेक्‍ट्रो फेल्टिंग करणे, एअर कॉम्प्रेसर, कपडे धुणे, कडबा कापणे, प्लास्टिक वस्तू तयार करणे, इनग्रेव्हिंग करणे, धार लावणे, हूक तयार करणे, रंगणीकाम, यार्न डबलिंग करणे, गोपदोरी काम करणे, वेस्ट कॉटन साफ करणे, कॉटन साफ करणे, सरकी व कापूस वेगळा करणे, बीम भरणे, गाठी मारणे, सिल्क फॅक्‍टरी, वायडिंग करणे, केशकर्तनालय चालविणे, कापूर साठा, काथ्या साठा, चरबी साठा, सुके गवत साठा, केस साठा, वाळलेले गवत व वैरण साठा, ताग साठा, गोणपाट क्‍लॉथ, खूरसाठा, शिंगेसाठा, लोकर काथ्या साठा, पशूच्या आतड्यांची तार काढणे, जनावरांचे खाद्य, चष्मा काच ग्राइंट करणे, इलेक्‍ट्रिक मोटार रिवायडिंग करणे, चुना भाजण्याची भट्टी, पॉवरवर मोल्डिंग करणे, तांबा-पितळ पॉलिश करणे, काच साठा, इलेक्‍ट्रिक पॉवरवर कांडी मशिन चालवणे, कापडावर कासिद काढणे, व्यवसायधारकाचे नाव बदल, ना हरकत प्रमाणपत्राचा समावेश आहे. 

सध्या 240 रुपये शुल्क, नवीन दर 320 रुपये झालेल्या व्यवसायांमध्ये डाळ व धान्याचे टरफल काढणे, क्रूड ऑइल साठा, पेंडसाठा व विक्री, इमारत लाकूड साठा, वूड प्रोसेसिंग, पॉवरवर छापखाना, ऍल्युमिनिअम भांडे तयार करणे, तांबा-पितळ पॉलिश करणे, सोने-चांदी गाळणे, सोने-चांदीचे तार काढणे, टायर रिमोल्डिंग करणे, सरकी साठा, धातूचे ओतकाम, जुने निकामी सामान साठा, ताडपत्री, पिशव्या, रबरी ट्युब साठा, तूंबच्या दोऱ्या, व्हल्कनायजिंग, लाकडी फर्निचर करणे आदींचा समावेश आहे. 



2017-18पासून वाढीव शुल्क (रुपयांत) 
व्यवसायांची संख्या    सध्याचे दर   नवीन दर 
       77                       160           210 
      45                        320           420 
      20                        240           320 
      13                         80            110 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com