esakal | वाढत्या मागणीने सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची मोठ्या बाजारपेठांमध्ये संधी 

बोलून बातमी शोधा

gul new 1.jpg

सोलापुरी गुळाची परंपरा अनेक दशकांची आहे. पूर्वीपासून उमरगा तालुक्‍यातील वीस ते चाळीस गावातून गुऱ्हाळाचा गूळ येत असे. सास्तूर, वर्टी, अचले, मुरूड आदी गावातून ततसेच दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यात देखील काही गावामध्ये गुऱ्हाळे आहेत. या सर्व गुऱ्हाळातील गूळ बाजारात येतो. विशेष म्हणजे हा गूळ वर्षभर टिकणारा असतो. या गावरान गुळाला आज देखील मोठी मागणी आहे. 

वाढत्या मागणीने सोलापुरी गुळाला ब्रॅंडिंगची मोठ्या बाजारपेठांमध्ये संधी 
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः मधुरतेची वेगळी ओळख असलेला सोलापुरी गुळाच्या ब्रॅडला सेंद्रीय उत्पादन व वाढत्या मागणीने नव्या संधी उभ्या राहिल्या आहेत. 
सोलापुरी गुळाची परंपरा अनेक दशकांची आहे. पूर्वीपासून उमरगा तालुक्‍यातील वीस ते चाळीस गावातून गुऱ्हाळाचा गूळ येत असे. सास्तूर, वर्टी, अचले, मुरूड आदी गावातून ततसेच दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्‍यात देखील काही गावामध्ये गुऱ्हाळे आहेत. या सर्व गुऱ्हाळातील गूळ बाजारात येतो. विशेष म्हणजे हा गूळ वर्षभर टिकणारा असतो. या गावरान गुळाला आज देखील मोठी मागणी आहे. 
सोलापूर व मराठवाड्याला जोडणाऱ्या भागात होणारी उसाची लागवडीचे वैशिष्ट्य असे आहे, की तेथील गुळाची चवच वेगळ्या गोडव्याची बनते. अनेक वर्ष सहज टिकणारा, मधुरतेची वेगळी चव व रसायनाच्या वापर नसलेल्या सोलापुरी गुळाची ही वैशिष्ट्ये म्हणायला हवीत. 
पुणे व मुंबईच्या बाजारात सोलापुरी गूळ ही ओळख कायम आहे. सध्याच्या गुऱ्हाळांनी ही सोलापुरी गुळाची परंपरा राखली. मागील काही वर्षात जेव्हा सेंद्रीय गुळाची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विकसित झाली. तेव्हा या सोलापुरी गुळाच्या बाजाराच्या नव्या संधी उभ्या झाल्या आहेत. 

सोलापुरी गुळाच्या बाजारातील संधी 
- पुणे व मुंबईत मागणी एवढा पुरवठा व्हावा 
- सेंद्रिय बाजारात सोलापुरी गुळाची नवी ओळख 
- साखर कारखान्यापेक्षा उसाचा अधिक मोबदला मिळणे 
- सामान्य गुळाच्या तुलनेत अधिक भाव 


पुणे व मुंबईत मागणी
सोलापुरी गूळ ही ओळख कायम आहे. पण सध्या सोलापुरात जो गूळ येतो त्याचे उत्पादन कमी असल्याने तो स्थानिक बाजाराच्या गरजा भागवण्याईतका येतो. त्यामुळे पुणे व मुंबईत मागणी असूनही माल पाठवता येत नाही. 
- महादेव मठपती, गूळ व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, 

गुळाला साखरेसारखा एमएसपी मिळावा
नैसर्गिक, सेंद्रीय सोलापुरी गुळाला केवळ दुकाने नव्हे तर ऑनलाईन बाजारात देखील स्थान आहे. पुढील काळात पून्हा एकदा सोलापुरी गूळ बाजारात ब्रॅंड बनू शकते. जर गुळाला साखरेसारखा एमएसपी मिळाला तर ऊसा संबंधी सर्व अडचणी कमी होतील व गुऱ्हाळघरे वाढतील. त्याचा छोट्या छोट्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो 
- अमर लांडे, जलकमल ऑर्गनिक गूळ उत्पादक