sushant kade.jpeg
sushant kade.jpeg

वाळूजमध्ये सत्तांतर; कादे गटाकडे पुन्हा सत्ता

वाळूज (ता. मोहोळ) : मोहोळ तालुक्‍यातील वाळूज ग्रामपंचायत निवडणुकीत कादे गटाने पुन्हा सत्ता मिळावली असून कादे गटाच्या 
श्री संत रामभाऊ ग्रामविकास आघाडीने 9 पैकी 9 जागा मिळवत विरोधी मोटे गटाच्या श्री खंडेराया ग्रामविकास आघाडीचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे. संत रामभाऊ विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे वाळूज ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती सुशांत ज्ञानोबा कादे यांचे गाव असल्याने वाळूज ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. 2010 च्या निवडणुकीत कादे गटाला निसटता विजय मिळाला होता तर 2015 च्या निवडणुकीत कादे गट पराभूत होऊन मोटे गटाकडे सत्ता गेली होती. यावेळी वाळुजकरांनी सत्तांतर करत कादे गटाला पुन्हा सत्तेची संधी दिली आहे. 

कादे विरुध्द कादे असे चित्र 

या निवडणुकीत कादे गटात फूट पडून 2010 च्या पंचवार्षिक निवडणुकीत उपसरपंचपदी असलेले कल्याण रामचंद्र कादे यांनी मोटे गटातून उमेदवारी मिळवून कादे विरुध्द कादे गटाविरुध्द दंड थोपटले होते. माजी उपसरपंच कल्याण कादे यांच्यासह आदिनाथ कादे (गुरुजी) यांनी कादे गटातून फुटून मोटे गटात प्रवेश केल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र दिसत होते. मात्र ग्रामस्थांनी ही युती अमान्य करत पांरपारिक कादे गटाला पूर्ण बहुमत दिले आहे. 

कादे गटाचे वियजी उमेदवार, कंसात मिळालेली मते 
वार्ड क्र. 1 दिनकर मधुकर कादे (466) वंदना प्रकाश चवरे (341) अर्चना काकासाहेब कादे (469) 
वार्ड क्र. 2 मच्छिंद्र सौदागर परीट (481) दत्तात्रय महादेव धनवे (471) विजया चक्रधर मोटे (477) 
वार्ड क्र.3 संदीप श्रीनिवास कादे (376) प्रियंका गणेश खरात (379) उर्मिला संजय कादे (375) 

संपादन : अरविंद मोटे 

सोलापूर महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com