शहरातील संसर्ग हातोय कमी ! केगावमध्ये सापडले सर्वाधिक आठ रुग्ण; आज 24 पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Saturday, 17 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 305 जणांच्या अहवालात 24 पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील 87 हजार 483 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील पाच हजार 424 पुरुषांना अन्‌ तीन हजार 800 महिलांना झाला कोरोना 
  • शहरातील आठ हजार 40 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आतापर्यंत शहरातील 340 पुरुष तर 172 महिला ठरल्या कोरोनाचा बळी 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग आता आटोक्‍यात येऊ लागला आहे. दुसरीकडे शहरातील टेस्टिंगचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. आज 305 संशयितांची टेस्ट करण्यात आली, त्यातील 24 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडले आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरातील 305 जणांच्या अहवालात 24 पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील 87 हजार 483 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरातील पाच हजार 424 पुरुषांना अन्‌ तीन हजार 800 महिलांना झाला कोरोना 
  • शहरातील आठ हजार 40 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आतापर्यंत शहरातील 340 पुरुष तर 172 महिला ठरल्या कोरोनाचा बळी 

 

शहरात आज जिल्हाधिकारी बंगल्याजवळ, केगावमध्ये सर्वाधिक आठ, धोंडीबा वस्ती, वामन नगर, धोंडे नगरात तीन (जुळे सोलापूर), मुरारजी पेठेत दोन, कुमठे गाव, लाभेष रेसिडेन्सी येथे तीन, अक्‍कलकोट रोड, निला नगरात दोन (बुधवार पेठ), सिध्देश्‍वर नगर (शेळगी) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 28 हजार 412 संशयितांना होम क्‍वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी 28 हजार 316 संशयितांनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून आता 96 संशयित होम क्‍वांरटाईनमध्ये आहेत. 14 हजार 237 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये होते. त्यापैकी 12 हजार 300 संशयितांनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. आता 86 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. कोरोनापासून आपले संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection in the solapur city is reduced! The highest eight patients found in Kegaon; Today 24 positive