ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करायचंय, पण यादीत नाव सापडत नाही ! ऑनलाइन असे शोधा नाव व उमेदवारांची कुंडली 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 13 January 2021

अनेकवेळा असा अनुभव आला, की मतदान करायला गेल्यावर अनेकांना मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ येतात. प्रसंगी नाव न सापडल्याने मतदान वाया जाते. मतदान केंद्रावरील गर्दीमुळे यादी पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे मतदारांना आपल्या मोबाईलवरही मतदार यादीतील आपले नाव, वॉर्ड क्रमांक, केंद्र क्रमांक, उमेदवाराची कुंडली घरबसल्या शोधता येते. त्यासाठी दिलेल्या माहितीचा फॉलो करा. 

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अवघ्या दोन दिवसांवर (15 जानेवारी) येऊन ठेपली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर अख्ख्या राज्यात चढला आहे. नेते, उमेदवार व कार्यकर्ते आपल्यालाच मतदान व्हावे, यासाठी मतदारांची मनधरणी करत आहेत. मात्र अनेकवेळा असा अनुभव आला, की मतदान करायला गेल्यावर अनेकांना मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ येतात. प्रसंगी नाव न सापडल्याने मतदान वाया जाते. मतदान केंद्रावरील गर्दीमुळे यादी पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे मतदारांना आपल्या मोबाईलवरही मतदार यादीतील आपले नाव, वॉर्ड क्रमांक, केंद्र क्रमांक, उमेदवाराची कुंडली घरबसल्या शोधता येते. त्यासाठी दिलेल्या माहितीचा फॉलो करा. 

असे पाहा मतदार यादीत आपले नाव 

 • प्रथमत: मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचं नाव शोधताना अडचण येईल. 
 • मतदार यादी पाहण्यासाठी सर्वांत आधी ceo.maharashtra.gov.in हा ई-मेल सर्च करा. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल. 

No photo description available.

 • या पेजवरील निवडणूक यादी (विभागनिहाय) पीडीएफ या पर्यायावर क्‍लिक करा. 
 • त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडा. 
 • त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाका. (समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे किंवा अक्षरे जशीच्या तशी रकान्यात टाका.) 
 • त्यानंतर Open PDF यावर क्‍लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होईल. 
 • "यादी -2021' असे या यादीचे टायटल असते. सुरवातीला दिसणारे तुमचं गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येते त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती पाहा. 
 • पुढे मतदान केंद्राच्या तपशिलात मतदान केंद्राचे नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते. 
 • त्यानंतर गावातील मतदारांच्या नावांची यादी दिलेली असते. त्यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग याची माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता. 

उमेदवारांबाबत सविस्तर माहिती पाहायची आहे? 

 • वॉर्डनिहाय उमेदवार आणि त्यांचे प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी panchayatelection.maharashtra.gov.in असे टाईप करा. 

No photo description available.

 • त्यानंतर तुमच्यासमोर राज्य निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन होईल. येथे Affidavit by the final contesting candidates या पर्यायावर क्‍लिक करा. 
 • यानंतर Search Document नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. येथे Local Body पर्यायांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडा. त्यानंतर Division ध्ये तुमचं गाव ज्या विभागात येतं तो विभाग निवडा. 
 • मग जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडा. 
 • पुढे Election Programe Name या पर्यायासमोर Gram Panchayat General Election -2020; Date : 15-01-2021 हा पर्याय निवडा. 
 • शेवटी तुमचा वॉर्ड निवडण्यासाठी दिलेल्या पर्यायावर क्‍लिक करा. 
 • त्यानंतर तुम्ही निवडलेल्या वॉर्डमधून निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी All Final Contesting Candidate List या पर्यायासमोर दिसेल. 
 • येथे उमेदवाराचा नोंदणी क्रमांक, पूर्ण नाव, वॉर्ड क्रमांक, वॉर्डाचे नाव आणि डाउनलोड हे पर्याय असतात. 
 • ज्या उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला पाहायचे आहे त्या उमेदवाराच्या नावासमोरील View Affidavit या पर्यायावर क्‍लिक केल्यास तुमच्यासमोर उमेदवारानं उमेदवारी अर्जासोबत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र ओपन होईल. 
 • या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची संपूर्ण कुंडली दिसेल. 

मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्यायही उपलब्ध आहेत, त्याबाबत 
पहिला पर्याय : 

 • Name Wise या पर्यायावर क्‍लिक करून District पर्यायावर क्‍लिक करा. त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरा. त्यानंतर Search पर्यायावर क्‍लिक केल्यास तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते दिसेल. 
 • Name Wise पर्यायावर क्‍लिक करून Assembly पर्यायावर क्‍लिक करा. त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव, तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरा. त्यानंतर Search पर्यायावर क्‍लिक केल्यावर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे दिसेल. 

दुसरा पर्याय : 

 • ID Card Wise या पर्यायावर क्‍लिक करूनही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासू शकता. त्यासाठी ID Card Wise केल्यानंतर जिल्हा निवडा व त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक टाका. दिलेल्या संख्येची बेरीज टाका. त्यानंतर Search पर्यायावर क्‍लिक केल्यावर तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही ते दिसेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information on how to find names in the voter list online