तिसऱ्या दिवशी तिचा अखेर

Varsha Akhade
Varsha Akhade

बार्शी (सोलापूर) : बार्शी-सोलापूर रस्त्यावर शेळगाव-राळेरास दरम्यानच्या शिवेवर शुक्रवारी सकाळी एसटी बस व क्रूझरच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्षा रामचंद्र आखाडे (वय 35, रा. अलीपूर रस्ता) यांचा आज (रविवारी) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यामुळे अपघातातील मृतांची संख्या सहा झाली आहे. शोकाकूल वातावरणात सोलापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचायत समिती कार्यालय सुन्न अवस्थेत
बार्शी पंचायत समितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभागात वर्षा आखाडे 2013पासून कंत्राटी कर्मचारी म्हणून महिला बचत गटाचे काम करीत होत्या. सोलापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यूशी तीन दिवस झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पती, मातुःश्री असा परिवार आहे. सोलापूर येथील रुक्‍मिणी यात्रेसाठी महिला बचत गटाचे स्टॉल उभा करण्यासाठी बार्शी येथून शुक्रवारी सकाळी आठ वाजता क्रूझर गाडीने या कार्यालयातील सर्वजण निघाले होते. त्यांच्या वाहनाचा एका तासाच्या प्रवासानंतर भीषण अपघात झाला. या अपघातात चालक संदीप घावटे, छगन काळे, देवनारायण काशीद, राकेश मोहरे, संभाजी महिंगडे अशा पाच जणांचा मृत्यू झाला होता. गंभीर जखमी शुभांगी बोंडवे या मृत्यूशी झुंज देत आहेत. मागील तीन दिवसांपासून पंचायत समिती कार्यालय सुन्न अवस्थेत असून शोककळा पसरली आहे. दिवसभर रोज जखमींची चौकशी करून गटविकास अधिकारी शेखर सावंत व सभापती अनिल डिसले माहिती घेत आहेत. उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी हे अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com