हेल्पलाईन क्रमांकावर गॅस बुकिंग, मोबाईल रिचार्जची चौकशी 

railway new.jpg
railway new.jpg

सोलापूर : हॅलो, जय हिंद सर रेल्वे सुरक्षा दलाकडून बोलतोय, आम्ही आपली काय सहाय्यता करू शकतो? ... सर, गॅस बुकिंग, मोबाईल रिचार्ज, समोसा व पिझ्झाची ऑर्डर द्यायची होती, मिळेल काय?... रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाईन क्रमांकावर अशा प्रकारच्या कॉल्सना सोलापूर विभागातील सुरक्षा दलाच्या जवानांना उत्तर देता-देता वैताग आणला आहे. सुरक्षा किंवा आरोग्याच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाईनचा वापर नागरिक ऑर्डरसाठी करीत आहेत. त्यामुळे सोलापूर विभागातील नियंत्रण कक्षातील आरपीएफ जवानही त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) च्या हेल्पलाईन 182 क्रमांकची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. प्रवाशांना प्रवासात येणाऱ्या अडचणी तसेच गुन्ह्यांबाबत आरपीएफकडे तक्रार करण्यासाठी या हेल्पलाइनची सुरुवात करण्यात आली. परंतु नागरिकांनी या हेल्पलाईन क्रमांकाला सध्या ऑर्डर दिल्या जात आहेत. या हेल्पलाईन क्रमांकावर जवळपास 100 टक्के बनावट कॉल्स येत आहेत. फोनच्या माध्यमातून रेल्वेची लाईनवर समोसा, बर्गर, पिझ्झाची, गॅस बुकिंग, मोबाईल रिचार्जच्या ऑर्डर देण्यात येत आहे. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफच्या सुरक्षा हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून प्रवासी ज्या वस्तूंची मागणी करीत आहेत, त्यात मोबाइल रिचार्ज करणे, गॅस बुकिंग, समोसा पिझ्झा पोहोचविण्याची मागणी आदींचा समावेश आहे. काही प्रवासी तर वीजबिल जमा करणे, सिलिंडर कनेक्‍शनसाठी बुकिंग करणे किंवा रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आरपीएफची मदत मागत असल्याचे कॉल येत असल्याची माहिती नियंत्र कक्षातील कर्मचाऱ्यांनी दिली. 
हेल्पलाइनवर रेल्वेत नोकरीसाठीही विचारपूस करण्यात येते. सोलापूर विभागातील आरपीएफ कंट्रोल रूममध्ये दररोज सरासरी 5 कॉल येतात. कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे कॉलही कमी झाले आहेत. महिनाभरातील एकूण कॉलपैकी 100 टक्के कॉल्स बनावट असतात. 

खाण्यापिण्याच्या मागणीचा काॅल 
रेल्वे प्रवासादरम्यान मदतीसाठी अगदी कमी कॉल प्रवासात येतात. या अडचणीत किंवा संकटात असल्याबाबत मदत करण्यासाठी हेल्पलाइन कक्षावर तासात बोटावर मोजण्या इतक्‍याच प्रवाशांचे कॉल येतात. यामध्ये काही प्रवाशांच्या किरकोळ तक्रारी असतात. तर सर्वाधिक कॉल हे खाण्या पिण्याच्या मागणीचे असल्याचे आरपीएफ कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

ऑर्डर बुकिंगबाबत विचारणा करणारे कॉल

हेल्पलाईनवर रेल्वेने प्रवास करऱ्या प्रवाशांनी प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणीविषयी विचारणारे कमी आणि वविध प्रकारच्या ऑर्डर बुकिंगबाबत विचारणा करणारे कॉल जास्त येत आहेत. प्रवाशांना ही हेल्पलाईन तक्रारीबाबत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. 
श्रेयस चिंचवडे, विभागीय रेल्वे सुरक्षा आयुक्त सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com