मुकेश खन्ना यांच्या शक्तिमान मालिकेच्या ‘या’ भागाचे चित्रण झाले होते अकलुजमध्ये

अशोक मुरुमकर
गुरुवार, 18 जून 2020

'शक्तिमान' या मालिकेने खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेचे चार दिवस अकलुज येथे चित्रण झाले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे हे चित्रण झाले होते, असं अभिनेते मुकेश खन्ना यांनी सांगितले आहे.

सोलापूर : 'शक्तिमान' या मालिकेने खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेचे चार दिवस अकलुज येथे चित्रण झाले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे हे चित्रण झाले होते, असं अभिनेते मुकेश खन्ना यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात पुन्हा शक्तीमान मालिका दूरदर्शनवर सुरु झाली. १९९७ मध्ये सुरु झालेली ही मालिका २००५ ला बंद झाली होती. त्याचे ४०० भाग प्रसारित झाले होते. मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका असेली ही मालिक अजूनही अनेकजण पाहतात.या मालिकेचे अकलुज येथे चित्रण झाले होते, असं मुकेश खन्ना यांनी सांगितले आहे. येथील शुटिंगची छायाचित्रेही त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकले आहेत. त्यात त्यांनी म्हटलंय की, ३० हजार मुलांबरोबर कोण एखाद्या मालिकेचे चित्रण करु शकेल का? पण शक्तीमान मालिकेने हे करुन दाखवले. यातूनच शक्तीमानची लोकप्रियता लक्षात येते. महाराष्ट्रातील त्यावेळचे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे अकलुजमध्ये चार दिवसाचे चित्रण झाले होते. एका मुलाचे अपहरण होते आणि त्याची सोडवणूक शक्तीमान करतो. हे त्यात दाखवलं होते. हा अविस्मरणीय भाग असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यापासून अपवाद वगळता प्रत्येकजण घरात बसून होते. त्यामुळे 'रामायण' आणि 'महाभारता'व्यतिरिक्त लॉकडाऊनच्या काळात नव्वदच्या दशकातील अनेक कार्यक्रम दूरदर्शनवर प्रसारित केले जात आहेत. तेव्हा सोशल मीडियाद्वारे शक्तीमान मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. शक्तीमान मालिकेचा १३ सप्टेंबर १९९७ ला पहिला भाग प्रसारित झाला होता. यामध्ये मुकेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. त्याचा शेवटचा भाग 25 मार्च 2005 रोजी प्रसारित झाला होता. या मालिकेत शक्तीमानने शिकवलेल्या 'छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी' लोकप्रिय झाल्या होत्या. यात मुकेश खन्ना हे शक्तिमानच्या भूमिकेत होते. शक्तिमान विविध शक्तींचा वापर करून वाईट गोष्टीविरुद्ध लढतो व शेवटी विजय सत्याचाच होतो, या तत्त्वावर जीवन जगतो. हवा, जमीन, अग्नि, वायु व अवकाशपासून मिळालेल्या शक्तींपासून शक्तिमानची निर्मिती होते. त्यास पृथ्वी वरील वाईट शक्तींचा नायनाट करण्याचे काम महर्षींनी सोपवलेले असते. शक्तिमान मालिका जशीजशी प्रसिद्ध होत गेली, तसे तसे मालिकेत देशभक्तिपर व स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या छोट्या चित्रफिती टाकण्यात आल्या.

शक्तिमान मालिकेत हवेत एक बोट उंच करून उडत असतो, व संकट समयी सामान्य नागरिकांची मदत करत असतो. ही गोष्ट मुलांच्या मनावर इतकी बसायची की लहान मुले या काल्पनिक पात्राला खरे समजून स्वतः पण एक बोट वर करून उडायचा प्रयत्न करू लागले. यातून काही अनूचित प्रकार घडले होते. 

मुकेश खन्ना याची पोस्ट...
क्या कोई ३० हज़ार बच्चों के साथ किसी सीरीयल की शूटिंग कर सकता है। शक्तिमान ने ये कर के बताया। ये बच्चों के बीच शक्तिमान की पॉप्युलैरिटी को दर्शाता है। महाराष्ट्र के अक्लूज में बच्चों के अपार हुजूम के बीच एक एपिसोड बनाया गया। जयकाल बच्चों का अपहरण करता है, शक्तिमान उन्हें बचाता है। महाराष्ट्र के उस समय के मिनिस्टर विजय सिंह मोहिते पाटिल के सौजन्य से उनके गाँव अक्लूज में चार दिन शूटिंग कर के हमने ये अभूपूर्व एपिसोड बनाया। जिसमें शक्तिमान ने अपने सात आदर्शों को देश भर के बच्चों के साथ दोहराया है। ये आदर्श देश के बच्चों के सर्वांगिक विकास के लिए अत्यंत महत्वपूर्ण हैं। मुझे कई बार आज के उस पीढ़ी के बड़े हुए बच्चों ने ये लिख कर भेजा है कि हम उन्ही आदर्शो को अपना कर बड़े हुए हैं   
वो सात आदर्श हैं..

350

शक्तिमान के सात आदर्श
1, कभी झूठ नही बोलना।
2, हिंसा नही करना।
3, चोरी नही करना।।
4, अपने से बड़े बुजुर्गों की इज्ज़त करना।
5, दूसरो की मदद करना।
6, स्वावलंबी बनना।
7, कभी नशा नही करना।।
मैं समझता हूँ कि आज के बच्चों को इन आदर्शों की और भी ज़रूरत है। बड़ों को अपील करूँगा की अपने बच्चों में इन आदर्शों को समाहित करो। उनकी ज़िंदगी, उनका भविष्य सुधर जाएगा। वो सही राह पर चलना सीख जाएँगे।। 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inside story that actor Mukesh Khanna Shaktimaan serial was shooting in Akluj