या वर्षी प्रेरणादायी हरित सायकल वारीचा थांबला पर्यावरण जागर

cycle vari.jpg
cycle vari.jpg

करकंब(सोलापूर)ः गेल्या नऊ वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला पर्यावरणाचा संदेश घेऊन येणारी नाशिकची सायकल वारी यावर्षी कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. . 

नाशिक येथील रत्नाकर आहेर यांच्या अध्यक्षतेखालील "नाशिक सायकलिस्ट' ग्रुपच्या वतीने सायकल वारीचे आयोजन केले जाते. नऊ वर्षांपूर्वी केवळ सात जणांसह चालू झालेल्या या सायकल वारीत गतवर्षी 100 महिलांसह 550 आबालवृद्ध सहभागी झाले होते. नाशिक ते पंढरपूर या चार दिवसांच्या प्रवासात मार्गावरील गावांत, शाळांत पर्यावरण जागृती व वृक्षारोपण करत ही वारी पंढरपुरात गर्दी होण्यापूर्वी आषाढी एकादशीच्या चार दिवस आधी पंढरपुरात येऊन माघारी जाते. 

हिरवे कपडे परिधान करून शेकडो सायकलींची रांग पंढरपूरच्या दिशेने जाताना सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. गावोगावी थांबून त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे अनेकांना पर्यावरणाची गोडी लागली आहे. ठिकठिकाणी लावलेल्या झाडांचे वाढदिवस साजरे करतानाच काही ठिकाणी नव्यानेच वृक्षारोपण केले जात असे. यामुळे अलीकडे आषाढी वारीसाठी येणाऱ्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांबरोबरच पर्यावरण पूरक हरित सायकल वारीचेही मार्गावरील गावामधील लोकांना वेध लागलेले असायचे. पण यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासनाने चैत्री पाठोपाठ आषाढी वारीही स्थगित केल्याने नाशिक येथून येणारी सायकल वारीही स्थगित करण्यात आली आहे. 

पंढरपूरच्या सायकल वारीसाठी दोन महिने अगोदर तयारी करावी लागते. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाची दखल घेऊन आम्ही नऊ वर्षे चाललेली सायकल वारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या आम्ही आमच्या सायकलिस्ट ग्रुपवर मागील सायकल वारीचे व्हिडिओ व फोटो दररोज शेअर करून वारीचा आनंद घेत आहोत.  
- डॉ. मनीषा रौंदळ, संयोजक, सायकल वारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com