Breaking ! विद्यार्थी शाळेत आला हीच पालकांची संमती; लेखी संमतीपत्र बंधनकारक नाहीच

03School_20fb_20_20Copy_2.jpg
03School_20fb_20_20Copy_2.jpg

सोलापूर : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. शाळेत येणाऱ्या मुलांच्या पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे. शाळांनी शासनाच्या आदेशानुसार तंतोतंत त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र, मुलगा शाळेत आला म्हणजे त्याच्या पालकांचे संमतीपत्र नसल्याने त्यास परत पाठविल्यानंतर तो पुन्हा शाळेत येणार नाही. त्यामुळे मुलगा शाळेत आला म्हणजे त्याच्या पालकाची संमती आहे, समजून संबंधित पालकांची लेखी संमती घेण्याची गरज नाही, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.

गृहभेटीतून उपस्थिती वाढविण्याचा होईल प्रयत्न 
मुलगा शाळेत आला म्हणजे त्याच्या पालकांची संमती आहे, असे समजून त्यांच्याकडून स्वतंत्र संमतीपत्र घेण्याची गरज नाही. सुरवातीला 50 टक्‍के मुलांच उपस्थिती राहील, असा अंदाज असून मुलांची उपस्थिती पाहून गृहभेटीतून मुलांची उपस्थिती वाढविण्यास प्राधान्य दिले जाईल. 
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर 

नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांची उपस्थिती सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्याबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांनी विशेष कौतूक केले. आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी (ता. 25) गावोगावी जनजागृती रॅली काढून पालकांना मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 78 लाख 47 हजार मुलांपैकी अंदाजित 20 ते 25 लाखांपर्यंत मुलांची उपस्थिती राहील, असा विश्‍वास शिक्षण विभागाने वर्तविला आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यातील एक ते दीड लाख विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश असेल, असा विश्‍वास शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी व्यक्‍त केला आहे. 

शाळेची वेळ बदलण्याबद्दल मार्गदर्शन 
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु झाल्या आहेत. आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून सुरु होणार आहे. या सर्व शाळांची वेळ सकाळी 11 ते दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहून शाळेची वेळ सकाळी करता येईल का, याबद्दलही नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. मात्र, 20 ते 25 दिवसांनंतर ही वेळ बदलावी का, याबद्दल शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com