स्ट्रीट बाजार : शॉपिंगचा आनंद होणार द्विगुणीत 

प्रशांत देशपांडे 
Thursday, 11 June 2020

जिल्हाधिकारी कार्यालयमागील आपत्कालीन रस्त्यावर "स्ट्रीट्र बाजार' तयार करण्यात येणार आहे. याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून 15 जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

सोलापूर : सोलापुरातील शॉपिंगप्रेमींसाठी खूषखबर आहे. कारण, सर्व वस्तू आता एकाच ठिकाणी मिळणार असल्याने हा आनंद द्विगुणीत होणार आहे. आपत्कालीन मार्गावर "स्ट्रीट बाजार' ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. येथे 87 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटीअंर्तगत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामातून स्वच्छ व सुंदर सोलापूर शहर तयार करण्यात येणार आहे. या कामांर्तगत जिल्हाधिकारी कार्यालयमागील आपत्कालीन रस्त्यावर "स्ट्रीट्र बाजार' तयार करण्यात येणार आहे. याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून 15 जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : दोन हजार शेतकऱ्यांना बांधावर दिले खते व बियाणे

चादर विक्री येथे होणार 
शहरातील विविध फुटपाथांवर किरकोळ विक्रेते अतिक्रमण करून साहित्य विक्रीस बसतात. हे अतिकम्रण कमी व्हावे; मात्र त्यांच्या व्यवासायवर कोणता परिणाम होऊ नये यासाठी स्ट्रीट्र बाजाराची संकल्पना राबविण्यात आली आहे. सोलापुरात तयार होणारी शेंगाची चटणी, कडक भाकरी, तसेच सोलापूरची चादर विक्री येथे होणार आहे. जानेवारीत सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा असते. त्या पार्श्‍वभूमीवर डिसेंबर ते 26 जानेवारीपर्यंत हा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत सिद्धेश्‍वर देवस्थानच्या अध्यक्षांशी सर्पक साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 

हेही वाचा :  राज्यातील डीएड शिक्षकांवर होणार अन्याय...का ते वाचा..

या ठिकाणी चार सेल्फी पॉइंट 
जिल्हाधिकारी कार्यालयमागील भिंतीवर चार सेल्फी पॉइंट तयार करण्यात येणार आहेत. यातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचे महत्त्व व त्यांचा प्रसार करण्यात येणार आहे. यात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची नंदीध्वज यात्रा, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ, पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्‍मिणी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता, कर्नाटकातील गाणगापूर येतील दत्त महाराज यांचे भिंतीवर पेंटिंग करून माहिती देण्यात येणार आहे. 

यासाठी खास तंबू तयार 
स्ट्रीट बाजारात एकूण 78 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलसाठी खास तंबू तयार करून घेण्यात आले आहेत. हे तंबू बाजार संपल्यानंतर अथवा पावसाळ्यात स्टॉलचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी काढून घडी करून घरी घेऊन जाता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The joy of shopping will be doubled