विविध मागण्यांसाठी राजभवनावर  22 जूनपासून फोन आंदोलन 

विविध मागण्यांसाठी राजभवनावर  22 जूनपासून फोन आंदोलन 

सांगोला (जि. सोलापूर) : शेतकरी, कष्टकरी आणि मोलमजुरी करणाऱ्यांच्या खात्यात थेट 15 हजार रुपये मदत निधी जमा करण्याबाबत राज्यपालांनी केंद्राला शिफारस करावी, कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे नेमके औषध व उपचार पद्धती जनतेसाठी जाहीर करावी, कुलपती या नात्याने राज्यपालांनी राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांत कोरोना संशोधन व विस्ताराबाबत काय कृती आराखडा राबवला हे प्रसिद्ध करावे यासह विविध मागण्यांसाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी राज्यपालांना 22 जूनपासून फोन आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. 

श्री. कदम यांनी कोरोना विरोधी मोहीम गतिमान व व्यापक होण्यासाठी केंद्रात व राज्यात स्वतंत्रपणे विरोधी पक्ष मदत व सल्लागार समिती स्थापन करावी, अशा विविध मागण्या राज्यपालांना केल्या आहेत. 21 जूनपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर सोमवारपासून (ता. 22) देशातील दुसरे फोन आंदोलन सुरू करण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.

किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक कदम यांनी सध्याच्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर औषध व लसी संदर्भात राज्याचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावा, चारा छावण्यांच्या धर्तीवर संस्थांच्या माध्यमातून जागोजागी कोरोना मदत व क्वारंटाइन केंद्रे सुरू करण्यात यावीत आणि कोरोना संकटकाळात राज्यपालांनी नेमकी कोणती कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडल्या तसेच जनतेला प्रत्यक्ष काय मदत केली याचा सुस्पष्ट अहवाल जनतेसाठी प्रसिद्ध करावा, अशा सात महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्र

 
आम्ही केलेल्या सातही मागण्या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व हिताच्या आहेत. राज्यपालांनी या मागणीची दखल घेतली नाही तर सोमवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार. यामध्ये राज्यभरातून राजभवनावर सतत फोन करून मागण्या कधी पूर्ण करणार हे विचारले जाणार आहे. हे आंदोलन घरातच बसून करायचे असल्याने मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत. 
- प्रफुल्ल कदम, 
किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com