संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोविड योद्धयांचा सत्कार 

sambhaji brigade.jpg
sambhaji brigade.jpg

सोलापूरः येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोरोनो टाळेबंदीच्या काळात अन्नधान्य, औषध, बेघरांना अन्न, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्यांना कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम जेष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक भिमाशंकर म्हेत्रे यांच्या हस्ते आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर संभाजी ब्रिगेड सोलापूर चे शहराध्यक्ष श्‍याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले व अजित शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कोरोना काळात शहरात व्यवहार बंद झाले, लाखो लोकांचा रोजगाराअभावी चुल पेटली नाही. या कठीण काळात माणूसकी जपणारे समाजसेवक आणि सामाजिक भान जपणाऱ्या संस्था मदतीला धावून आल्या. त्यांनी जातीपातीच्या भिंती ओलांडून मदत केली. उपचारासाठी रूग्णांना रुग्णालयातील अडचणींना सामोरे जावे लागले. आरोग्य आणि सरकारी यंत्रणा तोकडी पडत असताना स्वत:सह कुटुंबाचं जीव धोक्‍यात घालून जोखीम पत्करून पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जे कार्य केले ते प्रेरणादायी आहे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे कर्तव्य आहे असे मत राम गायकवाड यांनी व्यक्त केले. 
यावेळी कोरोना योद्धा म्हणुन नगरसेवक बाबा मिस्त्री, सिव्हिलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. औंदुबर मस्के, डॉ. सिद्धाराम बगले, डॉ. विनोद कोल्हापुरे यांचा सत्कार झाला. सामाजिक कार्यासाठी प्रार्थना फौंडेशन चे प्रसाद मोहिते, संभव फौंडेशनचे अतिश शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते महेश माने, टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चव्हाण, भारतीय जैन संघटनेचे श्‍याम पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी सोमनाथ पात्रे, आर्यन कदम, ओंकार कदम, संजय भोसले, विकास सावंत, वैष्णव कोणते, मुस्ताक शेख, रुपेश कीरसावंगी, नितीन देवकते, शुभम कुलकर्णी, धर्मा माने, दत्ता पवार, श्रीकांत सुरवसे, अशितोष माने, महेश तेलुर, महेश बिराजदार, कृष्णा झिपरे, श्रीमंत सुमित गायकवाड उपस्थित होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com